Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

लोढणें १ [ स्त्र्यगारं अंतःपुरं अवरोधनं ( अमरद्वितीयकांड-पुरवर्ग ११) रोधन = लोढण ] लोढण म्हणजे स्त्री.
वडिलांनीं आमच्या गळ्यांत हें लोढणें अडकविलें आहे म्हणजे स्त्री अडकविली आहे. लोढणें (रोधन) याचा अर्थ प्रतिबंध असाहि आहे. त्यामुळें हा शब्द मराठींतहि व्द्यर्थक आहे. (भा. इ. १८३४)

-२ [ लोडनं प्रतिघाते ] (ग्रंथमाला)

लोंढा [ लुंडकः = लोंडा, लोंढा. लुंडक = गोळा ]

लोण [ लवनं = लोण ] कोणा वर लोण येणें.

लोणकढें [ क्वथ् १ निष्पाके. नवनीतक्वथितं = लोणकढे ( तुप ) ( धा. सा. श. )

लोणा [ लवणक = लोणअ = लोणा ] ओलासारखा जमिनीवर येणारा मिठाचा एक विकार. ( भा. इ. १८३३) लोथ [ छुन्थ् १ हिंसायाम् = लोथ ( मृतशरीर) ] शीर कापून बाकी राहिलेला शरिराचा भाग. (धा. सा. श.)

लोधा [ लुब्ध = लोद्ध = लोध (धा-धी-धें ) ] ( भा. इ. १८३२)

लोंबणें [ लुबि अदर्शने. लुंबनं = लोंबणें ] तो आडमार्गात लोंबत राहिला म्हणजे दिसत नाहींसा झाला.  ( धा. सा. श.)

लोळविणें [ लू ९ छेदने. लोलूयनं = लोळविणें ] तरवारीनें लोळवणें = असिपत्रेण लोलुयनं. लोळणेंचें णिच् जो लोळविणें तो धातू, निराळा. ( धा. सा. श. )

लोळा [ लोहलः = लोळा ] लोहल म्हणजे सांखळीची मधली मोठी कडी.

लौंड [ लौड = वेड्यासारखें वागणें. लौड = लौंड (उन्मत्त, मूर्ख मनुष्य) = लौडा, लवडा (उन्माद = शिस्न ) ] (भा. इ. १८३२)

लौडा [ लौडः ] ( लवंडणें पहा)

लौंडा [ रुंड (offspring of mule on a mare)
= लौंडा ( Bastard), लवंडा ]

लौंडी [ रुंडिका = लुंडी = लौंडी, लवंडी ] रुंडिका म्हणजे कुंटण.