Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

पाडाव १ [प्रत्यवाय reverse = पाडाव ] reverse, defeat.

-२ [ प्र + दम् णिच् : प्रदाम्, प्रदान् = पाडाव ] one who is subdued in a battle, one who is a prisoner of war.

पाडु [ पारः (पारय् सामर्थ्ये)] (ज्ञा. अ. ९ पृ.२०)

पाडून १ [प्राध्वंकृत्य = पाडून] प्राध्वंकृत्य बंधनेन अनुकूलं कृत्वा । प्राध्वं बंधने ( १-४-७८)
पाडून मागणें म्हणजे वचनानें बांधून खरेदी करणें.

-२ [अह् शब्दे पूर्ववैदिक धातु. प्रत्यह्य = पाडून ]
उ० - घालून पाडून बोलणें. (धा. सा. श.)

पांढरपेशा [ पांडुर: +पेशः यस्य = पांडुरपेषः. पांडुरपेशः = पांढरपेशा ] पांडुर म्हणजे श्वेत व पेश म्हणजे रूप. पांढरपेशा म्हणजे ज्याचा वर्ण श्वेत गोरा आहे तो ब्राह्मणादि.

पांढरेंफेक [ पांडुरश्वेतं = पांढरेंफेक ] (भा. इ.१८३४)

पांढरें शुभ्र [ पांडुरं शुभ्रं = पांढरें शुभ्र ] (भा. इ.१८३४)

पांढरें सफेत [ पांडुरश्वेतं = पांढरें सफेत ] (भा. इ.१८३४)

पाणक्या [ पानीयकक = पाणकअ = पाणका = पाणक्या ] (ग्रंथमाला)

पाणचेट [ पाणचेट हा शब्द पण्यचेट या संस्कृत शब्दापासून निघाला आहे. पण्य म्हणजे विकावयाला काढलेला; आणि चेट म्हणजे दास, गुलाम. पण्यचेट = पानचेट किंवा पाणचेट; येथें ण्य चा न किंवा ण होतो. पाणचेटबद्दल पानचट असा हि उच्चार ऐकूं येतो. परंतु, पानचट म्हणजे पाण्याच्या चवीसारखे असा अर्थ आहे. चवट म्हणजे चवीचा. पाण्याच्या चवीचा जो पदार्थ तो पानचट पदार्थ. (भा. इ. १८३३)

पाणजा [ प्रार्य्यक = प्राज्जअ = पाजअ = पाजा = ( पणतु शब्दाच्या संसर्गानें ) पाणजा, पणजा-जी-ज] 
(स. मं.)

पाणथळ [पानीयस्थलं = पाणथळ ]

पाणंद १ [ पाणिंधमः ( मार्गः) = पाणंद ] पाणिंधम म्हणजे अंधेरा मार्ग. पाणंद म्हणजे दोन शेतांमधील अंधेरा मार्ग.

-२ [ पाणिंधम (रत्थ्या) = पाणंद ]
पाणिंधम म्हणजे असा अंधुक रस्ता कीं ज्याच्यांतून हातानें वेली एकीकडे सारून वाट काढावी लागत्ये.