Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पांघरणें, पांघरूण [ प्रघृण्ण् = पाघरण = पांघरणें. घृण्ण् धरणें घेणें ] (भा. इ. १८३३)
पाघळ [ प्राघारः, प्राघाराः ] ( धातुकोश-पाघळ २ पहा)
पाच [ स्पृच् = पाच (वनस्पति) ]
पाचकळ [स्खल् १ खनने. प्रस्खल = पाचकळ ] ( धा. सा. श. )
पाचर [ प्राचर, प्रचर = पाचर ]
पाची, आठी, दाही - येथें ई हा प्रत्यय जोर दाखवितो. (ग्रंथमाला)
पाचुंदा १ [ पंचपदा ] (दुवड पहा)
-२ [ पंचतयः = पांचुंदा ] पांच पेंढ्यांचा समुदाय. पाजणें [ आप्यायनं = पाजणँ ( आ लोप) = पाजणें ] आप्यायन म्हणजे संतुष्ट करणें.
पितरांना पाणी पाजणें म्ह० उदकानें संतुष्ट करणें. (भा. इ. १८३६)
पांजरपोळ [ पंजरप्रतोलः = पांजरपोळ] पंजरं पशुपक्ष्यादि बंधनगृहं व प्रतोलः मार्गः रत्था.
पाजी १ [ पाय्यः पाजी (तिन्ही लिंगी य अक्षरामुळें ) ] राय्य म्हणजे निंद्य किंवा नीच, हलकट.
-२ [ पज्जः = पाजा = पाजी ] पज्जः म्हणजे शूद्र. तूं पाजी आहेस म्हणजे तूं शूद्र आहेस. प्राचीनकाळीं ब्राह्मणाला शूद्र म्हणणें अपशब्द समजत. (भा. इ. १८३७)
पाटा [ पाटक = पाटा ] पाटक म्हणजे वांटावयाचा दगड. (भा. इ. १८३५)
पाटाउ [ प्रत्यायः toll, tax. = पाटाउ ] toll, tax.
उ०- कैवल्य कनंकाचेया दाना । नकडसी थोरुसाना ।
द्रष्टे याचे या दर्सना । पाटाउ जो ॥
ज्ञानेश्वर अमृतानुभव ६९-जुनी पोथी
पाटीवर बसणें [पाटी (Arithmetic) पाटीवर बसणें म्हणजे अंकगणिताला प्रारंभ करणें. ]
पाठ [ पृष्ठ = पाठ ] ( स.मं. )
पाठचा १ [ शी २ स्वप्ने. पृष्टशयः = पाठचा. पृष्टशयः भ्राता = पाठचा भाऊ. ( श = स = च ) ] ( धा. सा. श.)
-२ [ प्रातस्त्य = पाटच = पाठच ( चा-ची-चें ) पाठचा (सूर्य), पाठचें (ऊन) ] पाठचें उन्ह म्हणजे सकाळचें ऊन; पाठीवरचें ऊन नव्हे. (भा. इ. १८३४)
पाठनिपाठ [ पाठ: निपाठ: = पाठनिपाठ ] पुस्तक पाठनिपाठ केलें = पुस्तकें पाठनिपाठं कृतं.