Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

नीड [ स्निग्ध = निढ्ढ = नीड = नीट ] नीट बोल = स्निग्धं वद. (भा. इ. १८३४)

( आड ) नीड [ नि + अर्ध ]

नीत [ नीतिः = नीत ]

नीपरकापण [ निस् + परकत्वं = नीपरकापण ] the state of being without another.
उ०- नीपरीकापणी आपुलां । आकासाचा संचु वीराला ।
तो स्वयं असे पुढेला । कांही नाहीं की ॥ २१५
अमृतानुभव जुनी पोथी.

नीम [ नेम (अर्धा) = नीम ] (भा. इ. १८३४)

नुगमणें [ अनुगमनं ] (नुमगणें पहा)

नुमगणें [ अनुगमनं = नुगमणें = नुमगणें ] नुमगणें म्हणजे जाणणें. (भा. इ. १८३६)

ने आण [ नय आनय = ने आण ]

नेचा [ नेजक ( तंबाखूचा धूर पाण्यानें धुवून ज्या पात्रांतून जातो तें पात्र) = नेचा ]

नेट १ [ नैष्ट्यं = नेट ]

-२ [(स्त्री) निष्टा = नेट (पुं.) ] नेंट म्हणजे निश्चय.

-३ [नेत्रः = नेट]

-४ [ नेत्र = नेट्ट=नेट ] (भा. इ. १८३२)

नेटक ( का-की-कें) [ नैष्ठिकं (निश्चित) = नेटिकें = नेटकें ] नेटकें म्हणजे निश्चित.

नेटकी [ नेचकी ( सर्वांगसुंदर गाय ) = नेटकी ] नेटकी नार म्हणजे सर्वांग सुंदर स्त्री.

नेटकें [ नेपथ्य + अकच् = नेटक (का-की कें) well-attired. साडीचोळी नीटनेटकी नेस.

नेडें [ नीध्रं edge = नेडें ( सुईचें) ] नेत [ नियति ] ( नियत पहा)

नेभळा [ निर्बल: = नेंबळा = नेभळा. इ=ए, रेफामुळें ]

नेभळ (ळा-ळी-ळें) नाभिल = नेभळ. भि मधील इ ना कडे नेऊन ने ] नाभिल म्हणजे नाभि संबंधानें, फुटल्या बेंबीचा. नेभळें नेसूं नकोस म्हणजे नाभीच्या खालती नेसूं नकोस. हा मनुष्य नेभळा आहे म्हणजे (मूळार्थ) हा मनुष्य बेंबट्या आहे. बेंबट्या मनुष्य दिसावयाला ओंगळ व हास्यकारक दिसतो; सबब नेभळा म्हणजे भोळसर, हास्यकारक, ओंगळ इ. इ. इ. (भा. इ. १८३७)