Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

तो इतक्यात मुसलमानांची धाड महाराष्ट्रावर येऊन शक १२४० त महाराष्ट्र यवनाधीन झाले व मराठी भाषेचा राजाश्रय नाहीसा झाला. ह्या संकटसमयात आर्यसंस्कृतीचे बीज मराठयांच्या मनोभूमीत गेल्या तीनशे वर्षांत कितपत रुजले होते त्याची नामी परीक्षा उतरली. मराठा, कुणबी, क्षुद्र व महार हे आर्यधर्माला व हिंदू रूढीला बेमालूम बिलगले व ह्यांच्यातून फारच थोड्या लोकांनी धर्मांतर केले. परंतु आर्यधर्माच्या बाहेरील जे हलालखोर, कसायी, रंगरेज इत्यादी अन्त्यावसायी लोक, ज्यांच्यात आर्यसंस्कृतीचा फैलाव अद्याप झाला नव्हता, ते सबंदच्या सबंद मुसलमान बनले. हिंदू संस्कृतीच्या सीमाप्रदेशावरील अंत्यावसायी लोक मुसलमान बनण्यात मोठासा चमत्कार नव्हता. कारण, हे अन्त्यावसायी लोक मुळात हिंदू नव्हतेच. आर्यसंस्कृतिप्रसाराचे वारे देशात कितपत भिनले होते त्याची परीक्षा दुस-याही एका त-हेने झाली. मुसलमानी अंलाच्या भर ज्वानीत आर्यधर्मप्रसाराचे सत्कृत्य अठरापगड जातीतील संतांनी अनन्वित छळ सोसूनही पुढे चालू ठेविले. ते इतक्या जोराने ठेविले की भारतावर भारते, रामायणांवर रामायणे व भागवतांवर भागवते मराठी भाषेत शक १२०० पासून पुढील पाचशे वर्षांत लिहिली गेली. हा असला बिनखळ मारा मराठा, कुणबी, शूद्र व अतिक्षुद्र समाजावर करणेत्याकाळी अत्यंत आवश्यक होते. कारण, शक १२०० शेच्या पूर्वील माऱ्याने धर्मांतर करण्यापासून मराठा समाज यद्यपि परावृत्त झाला होता तत्रापि हा समाज अद्याप बनावा तसा राष्ट्रीय बनला नव्हता. अद्याप परकीय मुसलमान राज्यकर्त्यांविरुध्द उत्कट द्वेष त्यांच्या ठाई जसा बाणावा तसा बाणण्यास अवकाश होता. अद्याप पोटाकरता धर्मद्वेष्ट्यांची सेवा करण्यास मराठा लोकांस जशी लज्जा वाटू लागावी तशी लागली नव्हती. अद्याप मूर्ती फोडलेल्या, स्त्रिया भ्रष्ट केलेल्या, सज्जनांची अब्रू गेलेली, गोमातेचा वध झालेला उघडया डोळ्यांनी बघण्याची मराठयांना खंत वाटत नव्हती. अशा राजकीयदृष्टया अर्धवट, लज्जास्पद व अधम स्थितीत दक्षिणेतील नागमहाराष्ट्रिकोत्पन्न मराठे लोक असता, उत्तरेकडील ऐतरेयब्राह्मणाने गायिलेल्या भोजक्षत्रियांचे वंशज जे शहाजीराजे भोसले त्यांनी यवनाशी करामतीने व पराक्रमाने झुंझून स्वराज्याचा पाया घालण्याचा साहसी उपक्रम स्वत:च्या एकट्याच्या हिंमतीवर रचिला, आर्यक्षत्रियांचे नाव पुनरपि त्रिभुवन भर गाजविले आणि अखिल आर्यांच्या बेचाळीस पिढयांचा उध्दार केला!

१०५. उत्तरदेशीय महाराष्ट्र क्षत्रिय व नागमहाराष्ट्रिकोत्पन्न मराठा क्षत्रिय हे ह्याच्या पुढील काळात मिसळून व एकवटून जाऊन दोघांना ही मराठा ही संज्ञा सारखीच कशी पडत चालली तो इतिहास अंशत: शहाजीकालाच्या नंतरचा असल्यामुळे, त्या संबंधाच्या तपशिलात शिरण्याचे प्रस्तुत कारण नाही. महाराष्ट्र क्षत्रियांचा सोमवंश, माहाराष्ट्रिकांचा सूर्यवंश व नागांचा नागवंश असे तीन वेश मिळून सध्याचे मराठा राष्ट्र, अथवा खरे पाहिले तर सध्याचे मराठे लोक, बनले आहेत. चवथा परमार इत्यादिकांचा अग्निवंश. हा अग्निवंश केवळ कल्पित आहे असे चिंतामणराव वैद्य प्रतिपादितात. तत्रापि, एवढे खरे की परमार वगैरे ढुंढारदेशीय कुळे माहाराष्ट्रिकांच्या बरोबर दक्षिणेत उतरली. त्यांची संस्कृती माहाराष्ट्रिकांच्या संस्कृती सारखीच असल्यामुळे, नागवंशमिश्रणाने माहाराष्ट्रिकात जो बदल झाला तसला बदल परमारादींच्या मिश्रणाने झाला नाही.