Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

ब्रह्मन् लोकांत म्हणजे स्तावक असे जे ऋषि म्हणजे ब्राह्मण त्या लोकांत हे सूक्त रचण्याच्या काळी गणसंस्था व गणराज्य म्हणून ज्यास म्हणतात ती संस्था विद्यमान होती. ह्या ऋषींच्या म्हणजे ब्राह्मणांच्या गणाच्या पुढाऱ्याला गणपती व ब्रह्मणस्पती अशा संज्ञा रूढ होऊन गेल्या होत्या. गणपती व ब्रह्मणस्पती हे शब्द संज्ञा बनल्या कारणाने, सभेचा सभापती व देशाचा भूपती किंवा गावचा गावुंडा हे शब्द पुनरुक्तीला न जुमानता ज्या प्रमाणे सध्या आपण योजितो त्याप्रमाणे गणानां गणपतिं व ब्रह्मणां ब्रह्मणस्पतिं हे शब्द पुनरुक्तीला न जुमानता योजिले जात. ह्या ब्रह्मगणात सर्व व्यक्ती राजशब्दोपजीवी असत. पैकी सर्वात वयाने, अनुभवाने, शहाणपणाने व यशस्वी कृत्यांनी जो ज्येष्ठ त्याला ज्येष्ठराज म्हणत व त्याच्या हुकमती खाली सारे वागत. प्राय: ज्येष्ठराज सर्व ब्रह्मगणाचा साक्षात पिता असे (जनिता ब्रह्मणां असि) ब्रह्मणस्पतीला दुसरी संज्ञा बृहस्पती म्हणून असे. बृह् धातूला मन् प्रत्यय लागून जसा ब्रह्मन् शब्द होतो तसाच त्या धातूला अस् प्रत्यय लागून बृहस् शब्द त्याच अर्थाने होई. बृहस् म्हणजे स्तावक, स्तुती करणारा. बृहस्पती ऊर्फ ब्रह्मणस्पती ऊर्फ गणपती ऊर्फ ज्येष्ठराज भीम (भयंकर), अभित्रदंभन, रक्षोहण असून तो ज्यांना आपल्या संरक्षणाखाली घेई (यं रक्षसि ब्रह्मणस्पते) त्याला संकट शिवत नसे (न तं अंहो न दुरितं न अरातय: तितिरु:). तो शत्रूंना जाळणारा (निष्टप्ता शत्रुं), स्वजनांना मार्गात रक्षण करणारा (पथिकृत्) असे. ज्याला ज्याला म्हणून गणपतीचे साहाय्य मिळे (यं यं यजुं कृणुते ब्रह्मणस्पति:) तो तो शत्रूंचा विध्वंस करतो (वनुष्यत: वनवत्). जो ब्रह्मणस्पतीला तुपाची पक्वान्ने नेऊन देतो (यो अस्मै हव्यै: घृतवद्भि: अविधत्) त्याला तो पूर्वेकडील देशात विजयाने वसाहत करण्यास नेतो (तं प्राचा प्र नयति). तात्पर्य, गणांच्या पुढाऱ्याचा महिमा या सूक्तांत कवीने वर्णिलेला आहे. गणसंस्था व गणराज्य ज्या ब्रह्मगणांत रूढ झाले होते त्यांच्यात अशी चाल होती की गणातील सर्व स्त्रिया गणपतीकडून प्रजोत्पादन करून घेण्यात भूषण मानीत. एतत्संबंधाने यजुर्वेदाच्या वाजसनेयसंहितेचा तेविसावा अध्याय पहावा. त्यात गणांच्या गणपतीला स्त्रिया एणेप्रमाणे आव्हान करतात :

यजु:
गणानां त्या गणपतिं हवामहे
प्रियाणां त्या प्रियपतिं हवामहे
निधीनां त्वा निधिपतिं हवामहे
वसो मम