Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

३२. निजामशाही शहाजहान याचवेळी खालसा करता. परंतु शहाजी व आदिलशाही यांचा मामला अद्याप विल्हेस लागला नव्हता. खानजहान लोदीच्या बंडाच्या वावटळीत शहाजहानने शहाजीला अकरा हजारी मनसबदारीचे दान करून काही काळ गप्प बसविले आणि आदिलशाही मुत्सद्यांच्या तोंडाला निजामशाही मुलखाच्या वाटणीचे मधाचे बोट लावून लोदीला ती बाजूही बंद केली. लोदीचे बंड निमाल्यावर शहाजहानने शेख मैजुद्दिन हा वकील निजामशाहीच्या वाटणीचे बोलणे करण्याकरिता विजापूरास पाठविला. काही महिने भवतिनभवति होऊन, आदिलशाही मुत्सद्दी शहाजहानच्या मसलतीस राजी झाले व संमतीपत्र देऊन मैजुद्दिनाची त्यांनी बहुमानपुरस्सर शहाजहानाकडे रवानगी केली. दरम्यान मूर्तिजाचा खून व फतेखानाची नेमणी वगैरे प्रकार होऊन, निजामशाही शहाजहानाच्या अंकित झाली. तेव्हा आदिलशाही मुत्सद्यांची पायरणी करून निजामशाही दौलतीची वाटणी करून वासलात लावण्याचे शहाजहाच्या दृष्टीने काही कारणच राहिले नाही. उलट, निजामशहाचा धारूर प्रांत आदिलशहा दाबून बसला होता तो परत घेण्याकरता शहाजहानाने अब्दुल हसन व नसरतखान या सरदारांना खंदार व धारूर किल्ल्यांचा ताबा घेण्याच्या कामगिरीवर रवाना केले. मैजुद्दिन वकील याची रवानगी होण्याला व धारूरवर मोंगली सैन्य चालनू येण्याला एकच गाठ पडली. शहाजहानाच्या या कृतीचा आदिलशाही मुत्सद्यांना मोठा अचंबा वाटला आणि मोंगलाने आपली क्रिया सोडली एतदर्थ प्रत्याघात म्हणून मैजुद्दिन वकिलाला त्यांनी अटकेत ठेविले. वकिलाच्या अटकेची वार्ता ऐकून शहाजहानाने पित्त खवळल्याचा बहाणा करून आसदखानास खुद्द विजापूरावर स्वारी करण्याचा हुकूम केला. निजामशाही अंकित झाल्यावर व शहाजी मनसबदार बनल्यावर एकट्या आदिलशाहीचा आपण तेव्हाच फडशा पाडू, असा शहाजहानाचा मतलब होता. परंतु तो मतलब शहाजीने फिसकटून टाकिला. मनसबेवर लाथ मारून व तह धाब्यावर बसवून शहाजी आदिलशाही मुत्सद्यास मिळाला. शहाजीचा व मुरार जगदेव आणि रणदुल्लाखान यांचा अलीकडे बरीच वर्षे भातवडीच्या लढाईपासून स्नेह जुळला होता. तेव्हा ह्या तिघांनी विजापूराजवळील रंगा-याच्या हौदावर आसदखानाचा पुरा मोड करून त्याला आदिलशाही हद्दीच्या पलीकडे हरणदवडिने पिटाळून लाविले व सरहद्दीवरील परंड्याच्या किल्ल्यात ठाणे दिले. आसदखानाची नामोहरमी श्रवण करून, शहाजहानाने मोहबतखानाला दक्षिणचा सुभा देऊन विजापूरकराची खोड मोडण्याचा हुकूम केला (शक १५५४ चैत्र)