Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[३]                                                                ।। श्री ।।                                           १६७३ भाद्र. वद्य १४, ७ सप्टंबर १७५१

 

श्रीमंत राजश्री* पंतप्रधान स्वामीचे सेवेसीः-


विनंति सेवक शामजी गोविंद साष्टांगनमस्कार विज्ञापना. येथील कुशल तागाईत छ २७ माहे शौवल१३ मंदवार पावेतों औरंगाबादेस स्वामीचे कृपादृष्टीकरून यथास्थित असे. विशेष. राजश्री नारो शंकर याजकडून रा।। बाळाजी महादेव खजाना घेऊन येत होते. त्यास ब-हाणपुरी अबदुल खैरखान याणीं खजाना अटकाविला. तें वृत्त सविस्तर पूर्वी विनंतिपत्रीं लिहिलें आहे त्यावरून कळों येईल. त्याउपर नसीरजंग१४ यास सेवकानें चार गोष्टी सांगणें त्या सांगोन याजकडून रायनथमल यांस राजे रघुनाथदास यांजकडे पाठविलें आणि त्यास आपले घरीं बोलाविलें. त्यावरून छ २६ रोजीं राजाजी नसीरजंग याचे घरीं आले. उभयतांचें भाषण होऊन त्यांनी सेवकास व रा ।। राघो गणेश यांस बोलाऊं पाठविलें. नसीरजंग याणीं राजाजीस सांगितलें कीं तुह्मास आपणाकडून बिगाडाची शुरुवात करणें असेल तर हें कर्म सुखरूप करणें; नाहीं, तेव्हां गोष्ट कार्याची नाहीं. त्यावरून राजाजी१५ ह्मणों लागले कीं, आह्मासि आधीं आपणाकडून अंतर पाडणें नाहीं. त्याजकडूनच हरयेक विशईं जाजती होत्ये. खजान्याचे कामाची इतल्ला अबदुल खैरखान यांणीं आह्मास दिधली नसतां बेजा केलें. याउपर त्यास माकूल१६ करून लिहोन खजाना वगैरे परतोन देवितों. याप्रकारें निश्चय होऊन त्यांणी सांडणीस्वार बर-हाणपुरास ताबडतोब रवाना केला व आह्मास आज्ञा केली कीं तुह्मी श्रीमंतास लिहिणें. त्यावरून राजेश्री राघोपंत यांणी सविस्तर सेवेसी विनंतिपत्र लिहिलें आहे. सेवकास वकालतीचे जाबसाल लिहावयास प्रयोजन नाहीं. परंतु नसीरजंग यांस व राजाजीस स्वामीचीं पत्रें पावती करून आज्ञेप्रमाणें सविस्तर स्नेहाच्या अभिवृद्धीचा अर्थ निवेदन केला. त्याचें उत्तर प्रत्योत्तर उभयतांपासून घ्यावें तों हा मजकूर दरम्यान आला. यास्तव विनंतिपत्रीं लिहिणें लागला. हें वर्तमान राजश्री बगाजीपंत वकील येथें आले आहेत त्यांणी व त्यांचे पुत्रांहीं सविस्तर लिहिलेंच असेल. राजाजी व नसीरजंग या उभयेतांपासून उत्तर प्रत्योत्तरें दोचौ दिवसांत घेऊन मुफसल सेवेसी लिहितों. सेवेसी विदित होय हे विज्ञप्ती.

*राजश्री१२