Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
अर्जीचं उत्तर
बवसीले दखल पावणार अस्तानसी पेहर निशाचे नजर अनवार आजहर जीयागुस्तरसी गुजरला आणि करार केले कीं जन्मपरियेंत बालाजी बाजीराव व अवलाद बालाजी बाजीराव व कौम बालाजी बाजीराव आणि आह्मी उभैता फिदवी मये रुफकाये व अवलाद व कौम जे कोण्ही की जनाबअकदसअला व नवाबबहादरासी अमुलहुकूम व तखलूफ करीत व बेवफाई करीत त्यांजला शपथ महादेवजी व खंडेरावजी व बेलभंढारची आहे. आणि याच कौला प्रो। पोथी व गंगाजळ रूबरू नवाबबहादरावर आणि रूबरू वकीलान व मुतसदीयान आपलेचे उचले यास्तव माफक फजल व बकशीश पातशाहाचे सुबेदारी सुबे मुसत करून खिलाफत अकबराबाद सुबेदारी व सुबे दारुलखैदर अजमेर व फौजदारीहा मुतआलीक त्याची व दर सुबेदारी व सुबे मुलतान व लाहोर व थटा व फौजदारी भकर व आणिक फौजदारी तालूक त्याचे तिन्ही सुब्यांत व चार महाल मजारीफ काबील व फौजदारी हिसार व संबल व मुरादाबाद व बदाऊं यांत चउथऔष हिस्सा आंखुलासहसीपाहास मरहत व मुकरर केले पो की शुकरवसी यास या बकशीश उजमाचा बजावून भोगवट्याप्रमाणें मशरुत सुभेदारी अकबराबाद आणि अजमेर व मथुरा व नारनोळ व संबल वगैरे फौजदारी तालूक त्याचे एकून दोणी सुबे व पेशकशात सुबेदारी व फौजदारी माफक अहवाल रजावडे व जमीदाराचे आणि सीवाय त्याचे जे लवाजम व लवाहक सुबेदारी व फौजदारीचा होत असेल, काबीज व मुतसरीफ होऊन बंदोबस्त दोनी सुबे आणि फौजदारीचा की मुतआलीक त्याचे आहेत करारवाके करावे. आणि जे मुलक की या दोन्ही सुब्यांत तसरूफ करिंदे पातशाहीसी तसरुफ राजहा व जमीदारान लहानथोराचे सीवाय जमीदारी कदीम त्याची की गेला असेल खलशा करोन व सोडोन अर्धा अख्तयार मुतसदीयान पातशाईचे सोडावे आणि अर्धा कारणें खर्च सिपाह आपलीचे घ्यावा व दर सुबेदारी सुबे मुलतान व लाहोर व थटा व फौजदीरी भकर वगैरे मुतआलीक तिन्ही सुब्याची आणि चार महाल मजारफ काबील व फौजदारी हिसार व संबल व मुरादाबाद व बदाऊं यांत दोन हिस्से बराय खालसे शरीफे आणि एक हिस्सा कारणें खर्च सीपाह पातशाई की हमराह वजीररुलमुमालिकबहादर बाअलकाबे व नवाबबहादर बाअलकावेचे येक हिस्सा याने चउथऔष कारणें खर्च फौज हमराही आं खुलासहउसीपाचे करार पावले. बंदोबस्त केलीय उपरांतिक दोन हिस्से अख्तयार मुतसदीयान खालसे शरीफेचे आणि एक हिस्सा कारणें फौज वजीरुलमुमालिकबहादर व नवाबबहादराचे सोडावे आणि बाकी एक हिस्सा तुह्मी घ्यावा. हरवख्त खलस करणें. मुलुक आणि पारपत्य करणें. मुफसीदाचे जितकी फौज आणि सीपाह व सरदार व तोफखाना अफजुदरकाब विनंति कराल मरहमत केले जाईल. बदस्तूर उमराय उनाम फौजेसहित बंदगीत हाजीर होऊन जे काम की मानंद पारपत्य अबदाली वगैरेचे आज्ञा करूं, करीत राहावें. आणि जर काबील ऐकिलें आं खुलासहउसीपाहचे न होय, माफक दरखास्त त्यांचे सरदार तंई केला जाईल. जरी लायक माबादौलतचे असेल तरी मुतवजह होऊं. सादर होण्यापूर्वी फर्मान वालाशानचे ज्या जागा की अमील सरकारवालाचे अमल आणि दखल राखितात त्या जागेंत कोण्ही वजह दखल न करावें व मदती व कुमकी त्याचे राहावें. आणि बंदहापातशाहीसी जे कोण्ही जागीर खाऊन चाकरी न करीत ज्यावेळेस हुकम करूं जागीर त्यांची तगीर करून तीन हिस्से दाखल खालस शरीफेंत करणें आणि एक हिस्सा तुह्मी घेणें आणि पेशकशात मुकररी पातशाईची रजवाडे व जमीनदारान सीवाय पेशकशात सुबेदारी आणि फौजदारीचे जे कांहीं की मुतसदी निमे त्याचे साबीत करून देतील, तहसील करून, आपली चौथ वजा करोन बाकी सरकारवालांत पोहचावीत राहावे व दरसुबेजात व फौजदारीत दारोगा अदालतीचा सरकारवालासी राहे आणि किल्लेदार ही बदस्तूर साबीला सरकारवालासी राहेत आणि तगीरी तहदिली त्याची तालूक हजूर मोअलाचे राहे व हरगीज किलेजात आणि जागीर मशरुत किलेदारासी आणि दिवाणी बुताती वगैरे खिजमता पातशाई आणि लवाजमा व लवाहक त्यांचे आणि बागात व मीलीक पातशाईत तसरूफ व दखल न करावें. आणि राहाणार शहरान पातशाईस राजी ठेवावे व पारपत्य किल्ले व हरामजादान व रासत्यांत उपद्रव करितात त्यांचा करावें की मुसाफर व व्यापारी खातरजमेनें आमदरफ्त करीत राहात, की मुजरा हुसनखिदमतेचा जाहीर होय आणि पाया नेकीनतीजेचा होय आणि मेहेरबानी व तफजुलात अकदसअलाची आपलेविसी फार जाणावी.