Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[२८४] ॥ श्री ॥ २१ मे १७६१.
आशीर्वाद उपरि. चवेताळीसशा रुपयांच्या चिठ्या बाबूरायाच्या घेऊन पुणियास रवाना करितों. तुमची पत्रें चिटकोबाकडे रवाना करितों. पत्राप्रें॥ ऐवज देतील. श्रीमंतांचें पत्र पाठविलें तें पावले. तुर्त आह्मी रेवातीरीं आहों. श्रीमंत ब-हाणपुरीं गेले. सौभाग्यवती गोपिकाबाई येथें राहिली आहेत. नारायणरायास३२७ फोड्या आल्या. आठाचौ रोजांनी येथून गेलियावर वर्तमान निवेदन करूं, तों तुह्मीहि याल. वरकड सविस्तर मजकूर कळला. त्या अलीकडील पत्र तुह्मीं चैत्र शुद्ध १ निघतों ह्मणऊन लि।। तें उत्तम. त्याप्र।। निघोन आलांच असाल. सत्वर भेटी होईल. हे आशीर्वाद. कारकुनांची पत्रें पाठविलीं ते पुणियास चिटकोबा ज्यांचीं त्यांस पावितील. हे आशीर्वाद. मित्ती चैत्र व॥ २ द्वितीया, शके १६८३ वृषनाम संवत्सरे. हे आशीर्वाद.