Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

व चौथ सुभेजात पंजाब व मुलतान व थठा व भकर व चार महाल मजारफ काबील व मुरादाबाद व संबल व हिसार व बदाऊ की मरहमत जाहाली, दोन हिस्से बराय सरकारवाला व एक हिस्सा कारणें फौज वजीरुलमुमालीकबहादर आणि नवाबबहादराचे मुकरर जाहाले, बंदोबस्त मुलक मजकुराचा केलिया उपरांतिक घेतले जाईल. आणि पेशकशात मुकररी पातशाही जमीदारान व राजवाड्यासी सीवाय पेशकश सुबेदारीचे जे कांही मुतसदी पातशाई त्याचे जिम्मे साबीत करून देतील ते तहसील करोन, चौथ आपली वजा करून, बाकी सरकारांत पोहचती करीत जाऊं. व दरसुबेजात व फौजदारीहा दरोगे अदालतचे तरफ सरकारवालासी राहात आणि किल्लेदार ही बदस्तूर सरकारवालाचे राहात तगीरीबहाली किल्लेदाराची तालूक हजूर मोअकसी आहे; आह्मी हरगीज किल्लेजात व देहात पशरुत किल्लेदारां आणि दिवाणी व बुताती वगैरे खिदमता पातशाई आणि लवाहक त्याचे व बागात व इमलाक पातशाईत तसरुफ व दखल न करूं. व भोगवटा प्रों। तसरुफ मुतसदीयान पातशाईचे सोडूं व मदत व कुमकी राहूं व राहाणार. व वस्त व अज शहर पातशाहीस राजी ठेवूं; व तंबीह व पारपत्य किल्ले आणि हरामजादे रासत्यांत उपद्रव करणार व वाट मारणार आणि चोरांचा करूं की व्यापारी व मुसाफर पनाहात राहेत. व बंदाहय पातशाईसी की जे जागीरदार जागीर ठेवीत असतां चाकरींत हाजीर नाहींत. माफक मुकम कुदसीचे जागीर त्याची दाखल सरकारवालांत करूं व त्यापैकीं आपली चौथ घेऊं. दिन व धर्म व महादेवजी व खंडेरावजी दरमयान आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पंजाब, मुलतान, थटा व भकर व चार महाल मजारफ काबील व मुरादाबाद, संबल, हिसार व बदाऊं ह्या सुभ्यांची चौथ आह्माला आपण दिली आहे ती हुजूरचे दोन हिस्से व वजीरबहादर व नवाबबहादर ह्यांच्या फौजेच्या खर्चाकरितां एक हिस्सा देण्याचें ठरलें आहे; तर मुलूख मजकूरचा बंदोबस्त केल्यावर आह्मी आपली चौथ घेऊं. सुभेदारी पेशकशाशिवाय पातशाही जमेदार व रजवाड्यांच्या पेशकशांच्या ज्या बाबती हुजूरचे कारकून लोक दाखवून देतील त्या वसूल करून, त्यांतून आपली चौथ काढून घेऊन बाकी सरकारांत पोचती करूं. सुभ्यांतील व फौजदारींतील अदालतींचे जे हुजुरनीं किल्लेदार व दरोगे नेमले आहेत त्यांच्या नेमणुका व बदल्या हुजूरनींच कराव्या. किल्लेदारांना सोपविलेले किल्ले व गांव आणि दिवाणी व खानगी पातशाही खिदमता, तसेच त्यांचे लवाजमे व लवाहक व बागा व इमले ह्यांच्यावर आह्मीं जबरदस्तींने हक्क सांगणार नाहीं. पातशाही मुत्सद्यांच्या भोगवट्यास अडथळा करणार नाहीं. त्यांना मदत करूं व करीत जाऊं. पातशाही शहराच्या आंतबाहेरचा बंदोबस्त करूं आणि रस्त्यांत उपद्रव करणा-या व वाट मारणा-या चोरांचे व हरामखोर किलेदारांचे पारपत्य करूं; जेणेंकरून व्यापारी व मुशाफर सुरक्षित राहातील. जे जहागिरदार जहागिरी खाऊन आज्ञेंत राहात नाहींत त्यांच्या जहागिरा हुकुमाप्रमाणें जप्त करूं व त्यांतून आपली चौथ काढून घेऊं. दीन व धर्म व महादेवजी व खंडेरावजी दरमयान आहेत.