Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
जमीदाराचे आणि शिवाय त्याचे जे कांहीं लवाजीम व लवाहक सुबेदारी व फौजदारीचे होत असेत काबीज व मतसरीफ होऊं. आणि बंदोबस्त सुबेजात व फौजदारीहा बवाकई करुं. आणि जे मूलूक की सीवाय तसरुफ पातशाईसी की दर तसरुफ राजहा व जमीदारात लहान मोठे सीवाय जमीदारी कदीम त्याची की मुलक पातशाईस तसरुफ केला आहे त्याचे हातांतून खलस करुन व काढोन अर्धा दर तसरुफ मुतसदीयान पातशाईचे करुं व अर्धा कारणें खर्च सीपाह आपलीचे घेऊं. आणि हंगाम खलस करणें, मुलक व पारपत्य करणें मुफसीदांचे ज्या प्रो। फौज व सीपाह व सरदार व तोफखाना अफजुदरकाबाचे विज्ञप्त करूं हजुरांतून तैनात होत असावे व बदस्तुर उमरा यान उजाम आह्मी दोणी फिदवीयान मये फौज बराय बंदगी हाजीर राहूं. आणि जें कामें की कारणें पारपत्य अबदाली वगैरेचे आज्ञा होय जर योग्य ऐकिलें आमचेंच असलें तरी आह्मीच बजाऊं; आणि जर लायक मुदबजह होणें रायात खीलाफत जाहाबाजीचे होत असेल तरी हमरकाब होऊन मसदर तरदुदेचे होऊं. आणि जर काबील तई फरमूदन उमरायाचे होत असले तरी ज्यांत अमिराविषयीं विनंति करूं तोच तैनात होय की बइतफाक त्याचे त्या कामाचा सरंजाम करूं. ज्या वेळेस हुकम होईल ते समयीं हुजतबोजा दरमयान न आणूं. आणि आज्ञा जनाब अकदसेस बजाय कौल कारार आणि शपता आपलीचे बलकजादा धर्म आईन आपल्यासी जाणोन लिहिण्यापूर्वी या अहदनामयाचे ज्या जागा की अमील सरकारवालाचे खुद अमल व दखिलकाम आहेत त्या जागा दखल न करूं; व मदत व कुमक त्यांची करूं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जमीदारांच्या अब्रूप्रमाणें मामूल वहिवाटीला अनुसरून सर्व अटी पाळीत जाऊं व त्या सुभेदारीचे व फौजदारीचे जे हक्क व लवाजम असतील त्यांचा कबजा घेऊं व सुभ्यांचा व फौजदा-यांचा पक्का बंदोबस्त करूं व पातशाही राजेरजवाड्यांचे ताब्यांतील मुलुखांपैकीं जुना प्रांत कोणी बळकाविला असेल तो त्याच्या ताब्यांतून काढून अर्धा सरकारांत देऊ व अर्धा सैन्याचे खर्चाकरितां आह्मी आपलेकडे ठेवं. आणि एखादा प्रांत खालसा करण्याचे वेळेस व फिसाद्यांचें पारिपत्य करण्याचे वेळेस जी अधिक फौज, सरदार, शिपाई व तोफखाना आह्मी ठेवूं ती हुजूरतैनातींतील समजत जावी. आह्मी दोघे व इतर अमीरउमराव नित्याप्रमाणें हुजुरच्या सेवेंत हजर राहूं. आणि अबदाली वगैरेंचे पारिपत्य करण्याचे कामीं आमचाच सल्ला हुजूर ऐकतील तर तें काम आह्मी स्वत:च बजावूं. आणि ते काम करण्यास हुजूरची स्वारी स्वत:च जाणें जरूर पडेल तर आह्मी आपल्या स्वारीबरोबर येऊं आणि जिवापाड मेहनत करूं. अथवा तें काम अमिरांच्या हातून होत असल्यास आह्मी विनंति करूं त्या अमिरांनाच पाठवावें, किंवा त्यांची सल्ला घेऊन तें काम आह्मी करूं. आपण आज्ञा कराल त्या वेळेस हुज्जत घालणार नाहीं. आणि केलेल्या कौलकराराखेरीज हुजूरवालाची आज्ञा विशेष मानून व धर्म व स्मृति ह्यांचे जागीं आपली आज्ञा मानून, ह्या तहाच्या पूर्वी ज्या जागा हुजूरच्या खास ताब्यांत होत्या त्या आह्मी आपल्या ताब्यांत घेणार नाहीं इतकेंच नव्हे तर त्या जागांच्या बंदोबस्त ठेवूं.