Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

 [५६]         पे ॥ छ १८ जमादिलाखर.                                       ।। श्री ।।                                                 ७ मार्च १७५७

 

श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसीः-

आज्ञाधारक बाळाजी देवराव सां। नमस्कार विनंति प्रार्थना. येथील वर्तमान त॥ फाल्गुन वद्य द्वितीया ।।इंदुवार दरजागा हौदेगिरे जाणून स्वामीच्या कृपेनें यथास्थित असे. यानंतर बिदनूरच्या मामलतीचा निकाल जाहाला, त्याचा विस्तार राजश्री गोपाळराव याणीं तपशीलवार सेवेसी विनंति लिहिली असे. त्यावरून श्रुत होईल. जातरोखा कार्तिक पूर्णिमेच्या वाईद्यानें र॥ बसव लिंगाप्पा यांचा लिहून घेतला. हुंडया भाद्रपद अखेरच्या बेदिकत लिहून घेतों. र॥ नरसप्पा नाईक व र॥ तुळाप्पा नाईक गुमास्ते वलबसुंदरदास यांचा कराररोखा लिहून घेतला, व साहा लाख रुपयाचा नकद द्यावयाचा करार. याचा तसलिमातरोखा उभयता सावकारांचा लिहून घेऊन ऐनजिन्नस पाठविला आहे. व नजरेचे हत्ती दोन व घोडे साहा यावेयाविसींहि र॥ बसव लिंगाप्पास रुबरु राजश्री गोपाळराव याणीं सांगीतलें आहे. चांगले श्रीमंतांचे पसंदेस येत ऐसैंच संस्थानिक पाठवितील. आजीच्या हौदेगिरेच्या मुकामीहून र॥ नरसप्पा नाईक नख्त ऐवजाकरितां बिदनुरास जाणार आहेत. त्या समागमीं सेवकास रवाना केलेंच तर नजरेचे हत्ती व घोडे व फर्माश लिहिली होती. आज्ञेप्रमाणें तलाश होऊन जो जिनस मिळेल तो सेवेसी घेऊन येईन. बसव लिंगाप्पा येऊन भेटले तो तपशील राजश्री गोपाळराव यांच्या विनंतिपत्रीं साकल्य आहे. श्रुत होय. हे विज्ञापना.