Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[५५] ।। श्री ।। २८ फेब्रुवारी १७५७
राजश्री बाळकृष्ण आपाजी कमाविसदार नि॥ श्रीमत्११६ राजश्री पंतप्रधान गोसावी यांसिः-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ जनकोजी शिंदे दंडवत. सु॥ सबा खमसैन मय्या व अल्लफ. प॥ यावल प्रांत खानदेश हा परगणा मोकासबाब खे॥११७ करून मोगलाई व स्वराज्य, गनीमाई, बाबती, सरदेशमुखी वगैरे कुलीं अंमल आह्मांकडे श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामींनीं इनाम करून दिल्हा असे. तेथील अंमलास राजश्री महीपतराव नागेश यांसी पाठविलें असे. तर पां। म॥चें ठाणें म॥रनिलेच्या स्वाधीन करून देणें. जागा जागा तुमचीं माणसें असतील तीं उठवून आणणें. हे आपलीं माणसें पाठवून अंमल करून घेतील. प॥११८ मजकुरीं वसूल तुह्मीं घेतला असेल त्याची रुजुवात करून देणें. जाणिजे. छ ९ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें. हे विनंति.