Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[९३] ।। श्री ।। २८ सप्टेंबर १७५७.
पे॥ छ १३ मोहरम बुधवार सवाप्रहर रात्र प्रांरभ.
श्रीमंत राजश्री रावसाहेब स्वामीचे सेवेसीः-
आज्ञाधारक गणेश संभाजी सा।। नमस्कार विनंति ता॥ छ १३ मोहरम पावेतों स्वामीचे कृपेकरून सुखी असो. विज्ञापना एसीजेः निजामअल्लीखान याचें काल वर्तमान लिहिलें होतें तें छ १२ रोजीं मौजे बानगांव प॥ पिंपरी नजिक वरुड येथें मुकाम होता. आज शहरानजीक कोसावर राहणार. उदईक नवाबाच्या भिटी होणार. सेवेसी श्रुत होय. सरकारचे जासूद पत्र छ ११ रोजचें घेऊन आले तें काल संध्याकाळच्या दिडा प्रहरा दिवसा पावलें. बहुत काय लिहिणें. हे विज्ञापना.