Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[९५] ।। श्री ।। ३० सप्टेंबर १७५७.
पे॥ छ १५ मोहरम शुक्रवार प्रहर दिवस प्रात:काळ.
सेवेसी विनंति सेवक शामजी गोविंद सा॥नमस्कार विनंति. येथील कुशल त।। छ १४ मोहरम गुरुवार मुकाम नजीक शहर काळाचबुत्रा दरलष्कर निजामुदौला स्वामीचे कृपादृष्टीकरून यथास्थित असे. काली रात्रौ सेवेसी विनंति विनंतिपत्र पाठावलें आहे तें पावलेंच असेल. प्रातःकालीं नवाबांनीं कुच करून शहरानजीक आले. तिकडून नवाब बसालतजंगासमागमें दरगाकुलीखान व हैदरयारखान खोजे रहमतुलाखान वगैरे मोठेसे थाटानें आले. परस्परें तोफखान्याची कोटबंदी करून उभे राहिले. जसवंताचे तळ्यापाशी परस्परें भेटी जाल्या. बसालतजंग यांणीं अकरा मोहरा नवाब निजामुदौला यास नजर करून अदाबाब जाऊन आणून आणखी लोकांनीं नजरा करून उभयतां नवाब आपलाले हत्तीवर स्वार जाले. समागमेंच सलाबतजंग याचे डेरियास काले चबुतरियापाशी आले. नवाब सलाबतजंग दिवाणखानियाचे डेरियांत मसनदेवरच होते. त्यास निजामुदौला यांनीं सलामगाबापासून अदाबाब जाऊन आणून पुढें मसनदेपाशीं जाऊन नजर अकरा मोहरा व कांहीं रुपये करून नवाब उभे राहून भेटले आणि आपणापाशीं बसविले. बसालतजंग आपले काईद्यानें बसले. निजामुदौलायाकडील वाजदअल्लीखान व सैदकाबीलखान व बक्षी वगैरे यांणीं नवाब सलाबतजंग यास नजरा करून काईद्याप्रमाणें उभे राहिले. घटका येक जालियावर त्रिवर्ग नवाब व वाजदअल्लीखान ऐसे खलवतेत दोन घटका बसोन रुसखत होऊन आपले डेरियास लष्करांत आले. सेवेसी विदित व्हावें बद्दल विनंति लि॥ असे. याउपर होईल वृत्त तें दिनचर्येचें लिहिलें जाईल. विदित होय. हे विनंति.