Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

 [५४]                                                                            ।। श्रीशंकर ।।                                                     २६ फेब्रुवारी १७५७

  

तीर्थरूप* राजश्री भाऊसाहेबाचे सेवेसीः- 

विनंति उपरि. सविस्तर मजकुराचीं पत्रें तीर्थरूपाचें नावें पाठवीत असतों त्याजवरून कळेलच. सारांश, अबदाली दिल्लीस दाखल जाहाला. वजीर नामर्दी करून भेटला. याजमुळें पातशाहत बुडाली व तोहि शेर झाला. सांप्रत त्याचें पारपत्य जाहाल्याशिवाय दुसरा मुलुकाचा अथवा पैक्याचा मनसुबा होणार नाहीं. यास्तव त्याचेंच पारपत्य करणें जरूर पडेल. फौज आमची फार करून आली नाही व मल्हारबाची मुदलीच थोडी आहे. तेहि आली नाहीं. येथील बारीक वर्तमान ये रीतीचे! तथापि ईश्वरी दयेनें व स्वामीचें प्रतापें सत्वरच पारपत्य करतों. स्वामींनी दत्ताजी शिंदे व मुधोजी भोसले यांची गोविंद बल्लाळ वगैरे लहानथोरांची रवानगी करावी. आपले मुलुकांतील चौकशीचा मजकूर मनांत होता. परंतु हा मनसुबा मातबर पडला. हा शेवटास नेल्याखेरीज कोणास आमचे विचारें दुखवूं नये. राजश्री नारो शंकर वगैरे हे महालकरी मातबर. बाज्या सरदार यांस या दिवसांत खर्च करतां येत नाहीं. याजकडे किल्ले व मुलुक मातबर. यास्तव तुर्त यांजपासूनच चाकरी घेऊन पुढें अबदालीचे पारपत्य जाहालियावरी छावणींमध्यें चवकशी करणें तें करूं. तोंपर्यंत याच मनसुबियांत गिरिफदार११४ आहों. अंताजी माणकेश्वर व वकील व मनसाराम लिहीत असतील. यास्तव तिकडील सविस्तर वर्तमान लिहिलें नाहीं. सांप्रत समशेरबहादर व नारोशंकर यांस अंताजीकडे जावयास एकदोन पत्रें पाठविली आहेत. आह्मीहि मागाहून जातों. फौज मातबर मिळाली नाहीं, यास्तव हलक्या हलक्या मजली करीत भारी होत जात आहों. रजवाडे वगैरे लहान थोर बलाविले आहेत. जाटहि जुंझावयास तयार दिसतो. त्याचा मुलुक११५ जवळ पडला ह्मणोन त्यास जुंझणें प्राप्तच जाहालें. आह्मी गेलियावरी तोहि बहुधा येईल. स्वामींनीं शिंदे व भोसले वगैरे पाठवावे. जानोजी भोसलेहि यावयाजोगे असले तरी पाठवावे. आतां तर आह्मींच जुंझत आहों. तथापि कदाचित् लांबणीचा मनसुबा पडला, त्याची छावणी दिल्लीस जाहाली, आमची भोंवतीं जाहाली, तरी त्याचा उपयोग पडेल. तुर्त लडाई पडली तरी आमची आह्मी स्वामीचे प्रतापें करीतच आहों. दिल्लीहून होईल तें लिहून पाठवूं. र॥ छ ७ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें. हे विनंति.

पै॥छ १९ रजब, सन सबा.
मु॥ श्रीरंगपटण.

 *तीर्थरूप ११३

 *तीर्थरूप११३-१ 

*तीर्थरूप११३-२