Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[९०] ।। श्री ।। २७ सप्टेंबर १७५७.
पे॥ छ १२ मोहरम, मंगळवार प्रातःकाळ, सूर्योदयसमयीं.
अर्ज विज्ञापना ऐसीजे. येथील क्षे।। त।। छ ११ मोहरम सोमवार अडीच प्रहर रात्र मुकाम शहर सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. दोन आज्ञापत्रें-येक जाणारडाक, दुसरे चार शुतर स्वार-सादर जाहाली ते आजच दिढा प्रहरा रात्रीस पावलीं. आज्ञा कीं दोनसें रोखें गेलियास निजामअल्लीचा रोख सुटतो व मागें पडतें, यास्तव कसनेरच्या डोंगराकडे गेलिया उत्तम, ह्मणोन विस्तारें आज्ञा. ऐसियास कसनेरचा डोंगर उत्तम असे. दोन कुचें करून कसनेरच्या डोंगराकडे मुतवजे यावें. चारा डोंगरास फार आहे. जिरायताविशी ताकीद जाहाली पाहिजे. उदईक छ १२ मोहरमी मगंळवारीं हकीममहमदअल्लीखान यास घेऊन सेवेसी येतों. आज आतांच हकीममहमदअल्लीखानास नवाब बसालतजंग यापासून रुखसत करून घरास आणिलें. उदईक मगंळवारी बारा घटकानंतर भद्रा सरल्यावर सेवक सहितखानम॥रनिले येथून स्वार होतों. आतां विलंब नाहीं. निजामअल्लीहि चालला. येतों. परंतु कांही चिंता नाहीं. यासी कुरान वगैरे अहद पैमान करून येतों. एक दोन दिवस राहून मागती फिरोन जाईल असा करार करितों. व हे ह्मणजे बसालतजंग मुस्तेदहि आहेत. व उदईक मगंळवारीं विसा घटकानंतर बाहेर डेरेदाखल होतील. स्वामींनीं मंगळवारीं कुच करून कसनेरच्या रोखें पुढें पूर्वेस यावें. ह्मणजे बसालतजंगास आसरा व निजामअल्लीवर दबाव. हकीमजीस घेऊन सेवेस येतों. जवळ सर्व कामें उगवून घ्यावीं. सेवकास यावयास विलंब लागल्याबद्दल वसवासाहि फार जाले. परंतु मी कांहीं रिकामा सुखवस्त बसून राहिलों नाहीं. सरकार कामास्तव राहिलों. मी खबर कैसी लिहितों यांत काहीं संशय यास्तव महाराव जानोजी जसवंत निंबाळकर व माधवराव मोरेश्वर यांजकडे खासे खिजमतगार पत्रें सहित वेगळी खबर काय असेल ती कळवून सादर जाहाली ते लिहितील. सेवक उदईक येथून हकीमजीस घेऊन स्वार होतों. सर्व मजकूर रुबरुच अर्ज करीन. महाराव जानोजी जसवंत फार निखालस व सरकारचे मर्जीप्रे।। वतार्वे. वर्ततात यांत संशय नाहीं. व मजसीहि मैत्रिकी या दिवसांत फार जाहाली. व जसवंतरावहि सरकारचे मर्जीप्रे॥आहेत येथें चिरंजीव अवधुतराव यास ठेविलें. खोजेरहिमदुलाखां बहादर व नवाबसाहेब व नवाब बसालतजंग यांसीं मुकाबला घालून ठेविला. याउपरि पत्र सादर होईल तरी चिरंजीव अवधुतराव केशव याचे नावें जाहालें पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.