Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[५१]                                                                              ।। श्री ।।                                                         १४ फेब्रुवारी १७५७

 

राज१०७ श्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसीः-

पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. कुंजबिहारी बैरागी, मनसुकदासबाबा महापुरुष यांचे नातू, वास्तव्य कसबे कडा, यांनीं हुजूर कपिला संगम१०८ श्रीकृष्णातीर येथील मुक्कामीं येऊन विनंति केली कीं अहमंदशहा पातशहा यांणीं आपणास मौजे शिराथू देखील मजरे खाजगीपूर, ता. हवेली कडा, सरकार मजकूर, सुभे प्रयाग, हा गांव दरोबस्त सदाव्रताचे बेगमीस दिला. त्याचे परवाने मनसूरअल्लीखान वजीर व खानखाना कमरुद्दीखान यांचे आहेत. यास मौजे मजकूरचा अंमल आपणाकडे मोगलाई अंमलांत चालत आला. सरकारांत अंमल झाल्यापासून चालत नाहीं. यास्तव स्वामींनी कृपाळू होऊन पेशजीचे परवाने आपले जवळ आहेत हे मनास आणून सदर्हू गांव दरोबस्त आपणाकडे सदाव्रताचे खर्चाबद्दल करार करून द्यावा ह्मणून. त्याजवरून पेशजीचे परवाने मनास आणून कुंजबिहारी बैरागी हे मनसुखदास महापुरुष यांचे वंशीचे. हेहि श्रीगंगातीरीं वास्तव्य करून भगवद्भक्तिपूर्वक सदाव्रत चालवितात. थोर आहेत. यांचे चालविल्यास श्रेयस्कर आहे. हें जाणून याजवर कृपाळू होऊन मौजे शिराथू देखील१०९ मजरे खाजगीपूर, हा गांव दरोबस्त बैरागी यांस सदाव्रताचे बेगमीनिमित्त करार करून दिल्हा असे. तरी, पेशजी गांव चालत आल्याचा दाखला मनास आणून चालत आल्याप्रमाणें यांस व यांचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें मौजे मजकुर सदाव्रताचे बेगमीबद्दल चालवणें. प्रतिवर्षीं नूतन पत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची प्रत लिहून घेऊन अस्सल पत्रे भोगवटियास याजवळ परतोन देणें. पैका घेतला असला तरी फिरोन देणें. जाणिजे. छ२४ जमादिलावल, सुरुसन सबा खमसैन मय्या व अल्लफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति.