Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

 [८८]                                                            ।। श्री ।।                २७ सप्टेंबर १७५७.

पे॥ छ १२ मोहरम मंगळवार संध्याकाळ.

श्रीमंतराजश्री पंतप्रधान स्वामींचे सेवेसी:- विनंति सेवक शामजी गोविंद सा॥ नमस्कार विनंति ऐसीजे. येथील कुशल त॥ छ ११ मोहरम दरलष्कर नवाब निजामुदौला सांगवी प॥ जाफराबाद येथून कुच होता स्वामीचे कृपादृष्टीकरून यथास्थित असे. यानंतर येथील वर्तमान सविस्तर अंबडापुरीहून कुच जालियावर सेवेसी लिहिलें आहे. प्रणीतातीरीं सा मुकाम करून शहरास पत्रें प॥ होतीं व येक ग्रहस्थहि बसालतजंग याकडे पाठविला आहे. शहरचीं उत्तरें आलीं र॥ लक्षुमणराव खंडागळे पाच सातशें स्वारांनसीं त्याच मुकामीं येऊन मुलाजमत केली. दुसरे रोजीं कुच करून आठ कोस वरुड प॥ मार येथें मु॥स आले. उतरते डेरां आपण दरबारास गेलों तों नवाब जनान्यांत होते. सैद वाजदअल्लीखा भेटले. यांसी मजकूर केला कीं श्रीमंताकडील फौजा शहराचेच नजीक येऊन पोहचल्या. नवाब जलदी करून शहरास जातात. यामुळे नाहक उपाधीस कारण. त्यास ह्मणों लागले कीं नवाब सलाबतजंग बसालतजंग याचा दारमदार होणार तो जाहला. शहानवाजखान याचाहि कजिया फैसल होऊन किल्ल्यास नवाबाकडील माहासरा होता तो उठला. श्रीमतांकडील लोकांनीं किलेयावर अनुकाहि चढविला. आतां कांहीं खलष राहिला आहे एसें नाहीं. आह्मी येथवर आलों. त्यास याउपर खावंदापावेतों येकवेळ खमखा जाऊन परतोन येऊन खावंदापासीं आपला आहवाल जाहीर करणें व श्रीमंताचे कृपेची वरकी करून घेणें या दो कार्यास्तव नवाब जातात. छ मजकरीं दाभाडी परगण्यांत येथून बारा कोसांवर मु॥स जाणार. तेथून कडसांगवी, तेथून शहरास दाखल व्हावयाचा निश्चय जाहला असे. विदित होय. हे विज्ञाप्ति.