Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

३. परंतु एकंदरींत येथून तेथून सर्व बखरींत कालविपर्यासाचा दोष ओतप्रोत भरला आहे.

कोणतीहि बखर घ्या, तींत कालाचा विपर्यास झाला नाहीं असें क्वचितच आढळेल. पुराणांतील कल्पित कथांच्या संसर्गानें, मुद्रणकलेच्या अभावामुळें व ऐतिहासिक सत्यासत्यतेसंबंधी लोकांत असलेल्या औदासीन्यामुळें हा दोष ह्या बखरनविसांच्या बखरींतून शिरला आहे. रामरावणी कथांच्या श्रवणानें विचारांत अतिशयोक्तींचें प्राबल्य फार झालें व कालाच्या पौर्वापर्याचें महत्त्व ह्या बखरनविसांच्या अगदींच लक्ष्यांतून गेलें. कालविपर्यासाचा दोष अत्यंत कमी म्हटला म्हणजे "भाऊसाहेबांच्या बखरीत" अतिच कमी आहे; व अत्यंत जास्त पहावयाचा असल्यास "पेशव्यांच्या बखरींत" अमूप आहे. ह्या दोन आद्यंताच्या मध्यें इतर सर्व बखरींचे वर्गीकरण दोषांच्या न्यूनाधिक्याच्या प्रमाणानें करितां येईल.
४. निरनिराळ्या प्रसंगांचें अन्योन्य महत्त्व ह्या बखरींतून मुळींच दाखविलें नाहीं व क्षुल्लक गोष्टींचा निरर्थक पाल्हाळ मात्र केला आहे.

[अ] (१) शिवाजीची सूर्यवंशापासून उत्पत्ति, (२) शिवाजीच्या मरणसमयीं त्याच्या कोठारांतील दाण्यागल्याची याद, (३) भाऊसाहेबाच्या बखरींतील मलकाजमानीचें रडगाणें इत्यादि कथा कमजास्त कल्पित असून क्षुल्लक आहेत. त्यांचा अन्यदृष्ट्या कितीहि उपयोग असला तरी इतिहासदृष्ट्या फारच थोडा आहे.

[ब] (१) शिवाजीच्या पूर्वीच्या व त्याच्या वेळच्या मुसुलमानी राज्यांची माहिती, (२) शिवाजीच्या कोणत्याहि मोहिमेचा संगतवार वृत्तांत, (३) शिवाजीच्या किंवा पेशव्यांच्या गृहस्थितीची चोख हकीकत ह्या बखरींतून बिलकुल मिळण्यासारखीं नाहीं. जी कांहीं थोडीबहुत माहिती दिली आहे ती इतकी असंबद्ध, परस्परविरोधी, संदिग्ध व प्रायः अविश्वसनीय आहे कीं, इतर साधनांच्या साहाय्यावांचून त्यांपैकीं कोणतीहि एक खरी मानणें मोठें सकटाचें आहे.

[क] अस्सल कागदपत्रांच्या साहाय्याव्यतिरिक्त ह्या बखरीं वाचूं गेले असतां एक प्रकारची चमत्कारिक चूक होते. ह्या बखरींतून जो मजकूर खरा असतो तो त्यांत असलेल्या खोट्या मजकुरापासून विलग काढून घेतां येत नाहीं. सारांश, केवळ ह्या बखरींवर भिस्त ठेवून इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केल्यास, सत्यासत्यतेच्या निर्णयाची कसोटी जवळ नसल्यामुळें, तो वायफळ जाण्याची बहुतेक खात्री आहे. पुष्कळ बखरींतून एकच मजकूर एकसारिखा आल्यास, बहुमताच्या न्यायानें, तो खरा मानण्याचीहि ह्या बखरींच्या संबंधानें सोय नाहीं. पुष्कळ ऐतिहासिक गोष्टींच्या अभावाचें साधारणत्व ह्या बखरींतून सांपडतें; परंतु, तेवढ्यावरून त्या गोष्टी झाल्याच नाहींत असें विधान करणें मोठें धोक्याचें काम होईल. तात्पर्य, एक अस्सल चिटोरें सर्व बखरींच्या बहुमताला हाणून पाडण्यास बस्स आहे. ह्या संबंधानें विचार करिता Majority of documents वर फारशी भिस्त ठेवितां येत नाहीं. कांकीं विश्वासार्ह अस्सल कागदाच्या एका चिटो-यावर जितका विश्वास ठेवितां येतो तितका स्वदेशीय व विदेशीय बखरकारांच्या व बखरवजा इतिहासांच्या भाकड कथांवरती अर्थात् ठेवितां येत नाहीं.

ही स्थिती ह्या बखरींची झाली.