Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[२२४] पे॥ छ ४ मोहरम.।। श्री ।। २ आगष्ट १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसि:
पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. तुमचीं पत्रें आलीं तीं पावलीं. साद्यंत लिहिलें वर्तमान कळों आलें. याउपरिहि तिकडील सर्व वरीचेवरी लिहीत जाणें. खासा स्वारी मजलदरमजल येऊन दिल्लीस दाखल जाहाली. तमाम शहराचा बंदोबस्त केला. किल्यांत अबदालीकडील लोक होते याकरितां किल्यास मोर्चे लाविले. खंदकावरी मोर्चे कायम होऊन तोफांचा मार दिल्हा. तेव्हां आंतील लोक घाबरे होऊन कौल मागों लागले. सबब त्यांस कौल देऊन हत्यारसुद्धा बाहेर काढून छ३०१ १९ जिल्हेजीं किल्ला फत्ते जाहाला. जागा फारच बेश, मजबुदीची आहे. याउपरि सर्व बंदोबस्त यथास्थित होईल. सुज्याअतदौलेहि जवळ यमुनेचे पैलतीरीं येऊन उतरले आहेत. गोड बोलतात. पुढें होईल वर्तमान तें लिहिलें जाईल. ऐवजाविशीं वारंवार लिहिलें असोन अद्याप ऐवज येत नाहीं हे कोण गोष्ट ! याउपरि पत्र पावतांच बाकीचा ऐवज व रसदेचा भरणा करून जलदीनें पाठवणें. विलंब न लावणें. ऐवज रवाना जाहला आहे तोहि ताकीद करून सत्वर येई तें करणें + ऐवजाविशीं वारंवार लेहून भागलों ! याउपर मिळेल त्यापासून पैका घ्यावा हेच बाकी राहिली! श्रीरंगपट्टणाचे३०२ वर्षी फारकरून दाखवायाचें बोलत होता. प्रस्तुत रसद वगैरे पैक्याची तरतुद होऊन येईना, हें कामाचें नाहीं. अंतर्वेदचा बंदोबस्त करणें. बंगस व कांहीं रोहिले घरास जातील. सुजादौलाची उमेद अबदालीस कळली ! आंतील आंतहि३०३ पेंच वाढतील. दिल्ली घेतल्यामुळें कमर तुटली ! पुढें सर्व उपाय करणें तो करितों. लढाई तर पाण्यावर३०४ मौकूफ आहे. तोंपर्यंत फुटफाट करणें ते करितों. तुमची बातमी ठीक आहे. वरचेवर लिहीत जाणें. र॥ छ २० जिल्हेज बहुत काय लिहिणें. हे विनंति.