Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

French was for nearly three hundred years (i. e. from 1066 A. D. to 1363 A. D.) the official language in England. William the Conqueror had conquered England not merely to govern the English, but to dispose of its wealth. He distributed land, offices, and honours to his (Norman) vassals, so systematically that the whole country was enveloped in a close net-work of which every knot represented a barony, a county, a Norman domain. In each town, each rural district, the proprietor, the judge, the eivil or military chief and his vassal constituted a Frech centre. Towards the end of the twelth century the Saxon had accepted a few Frech words. In the fifty-eight thousand lines of Layamon’s Brut there are eighty words of Frech origin. At the end of the thirteenth century we find a hundred (words) in the first five hundred lines of Robert of Gloucester. Nor is this all; the grammatical structure is modified. The case endings are beginning to disappear; the final vowels changed into e mute, are no longer pronounced. The conjugation loses a few more of its shades. The plural terminations of persons are dropped. The noun loses the plurals formed by the weakening of the vowel, as foot, jeet, its genetive plural in eve. The genitive singular in is, es, soon reduced to g, alternates with the prepositions of and to. The adjective is still declined and often forms its plural in e, but the insignificance of these termination cause it to be soon lost &c. &c, In counting all the words in the dictionaries of Webster and Robertson, M. Thommerel has shown that out of 43,566 words, 29,853 come from the classical languages, 13,230 from the Teutonic .

नार्मन-फ्रेंच भाषेच्या दडपणाखालीं साक्सन भाषेची तीनशें वर्षात काय दिशा झाली, त्याची ही अशी कथा आहे. फ्रेंच भाषेच्या दडपणाखालीं बास्क भाषा, किंवा रूसच्या दडपणाखाली पोलीश भाषा, किंवा संस्कृत भाषेच्या दडपणाखालीं भिल्ल, खोंड, वगैरेंच्या भाषा, किंवा लॅटिनच्या दडपणाखालीं एद्रुस्कन भाषा, ह्यांचाहि इतिहास वरच्याप्रमाणेंच आहे. म्हणजे जिंकणा-या लोकांच्या भाषेपुढें जिंकलेल्या लोकांची भाषा नष्टप्राय होते, असा जगांत इतरत्र कोठें कोठें अनुभव आहे. हा अनुभव मराठीला १३१८ पासून १६५६ पर्यंत येत होता. नुसते शब्द व प्रयोग जोंपर्यंत येत होते, तोपर्यंत मराठीच्या अंतःस्वरूपाला फारसें भय नव्हतें. परंतु उभयान्वयी व शब्दप्रयोगी अव्ययें घेण्याचा आणि विभक्तिप्रत्यय व उचार फारशीच्या धर्तीवर बदलण्याचा जेव्हा मराठींत क्रम सुरू झाला, तेव्हांच तिचें अंतःस्वरूप बदलण्यास प्रारंभ झाला. हा बदल सतराव्या शतकांत मराठ्यांनीं स्वातंत्र्यार्थ जे प्रयत्न केले त्यामुळें जास्त व्हावयाचा थांबला. नाहीपेक्षां, जर मराठ्यांची राज्यक्रांति न होती, तर थोड्याच दिवसांत मराठी, उर्दू झाली असती. महाराष्ट्रांत जशी सतराव्या शतकांत क्रांति झाली, तशी उत्तर हिंदुस्थानांत मुसुलमानी रियासतीच्या अव्वलीपासून अखेरीपर्यंत म्हणजे १२ व्या शतकापासून १७ व्या शतकाच्या अखेरपर्यंत केव्हांहि न झाल्यामुळें, हिंदी भाषेची उर्दू बनली. व्यवहाराकरतां उर्दू भाषा मुद्दाम बनविली, असा कित्येकांचा समज आहे. परंतु तो खोटा आहे. मुद्दाम भाषा बनविणें व तीं बनवून प्रचारांत आणणें ह्या गोष्टी मानवी इतिहासांत अशक्य आहेत. कोणतीहि भाषा आपोआप बनत जाते व ती बनण्याचीं कारणें तद्वाह्य असतात. आतां येथें कोणीं असा प्रश्न करील कीं, हिंदीची जर उर्दू बनली, तर अद्याप हिंदी भाषा चालू कशी राहिली? तर त्याला उत्तर आहे. उर्दू भाषा बनत बनत जों जोमांत येते व हिंदी मागसत जाते तों मराठ्यांच्या राज्यक्रांतीनें मुसुलमानांच्या सत्तेला, संस्कृतीला व भाषेला जबरदस्त खो बसला व यच्चयावत् सर्व हिंदुस्थानांतील भाषा बंधमुक्त झाल्या. सिंधी, पंजाबी, हिंदी, मारवाडी, बंगाली, भोजपुरी, रांगडी, गुजराथी, मैथिली, ओढिया, वगैरे उत्तर हिंदुस्थानांतील भाषा मुसुलमानांचे राज्य जर आजपर्यंत रहातें, तर निःसशय मरणाच्या पंथास लागत्या. सारांश, मराठ्यांनीं जुलमी फारशी व उर्दू ह्यांना उखडून पाडल्यामुळे, हिंदुस्थानांतील देशी भाषांना जीवदान मिळालें.