Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १६० ] श्री. १७३८.
राजश्री जानोजीराव निंबाळकर गोसावी यासीः -
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। बाजीराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत गेलें पाहिजे विशेष राजश्री भगवंतराऊ रामचद्र व मोरेश्वर रामचंद्र व शिवराऊ रामचद्र यांचें कुळकर्ण व ज्योतिषपण पुरातन वतन मौजे तादळी ता। राजंणगांव येथईल असता, नारो दत्तो व यादो तुकदेव पानगे कुलकर्णास व जोमपणास नडले होते, आणि कजिया करीत होते त्यावरून मौजे मजकूरचे मोकदम व समाकुल पांढरी बलुते हुजूर आणून, इनसाफ मनास आणिता, पडितमशारनिले वतन कुळकर्ण व जोसपणे खरें होऊन पानगे खोटे जाले त्यावरून मशारनिलेचें वतनपत्र अलाहिदा करून दिल्हें आहे तर, तुह्मीं आपल्याकडील अंमलदारास ताकीद करून कुळकर्ण व जोसपणाचें वतन सुरळीत चालें तें केलें पाहिजे पानगियासी वतन नाहीं कजिया कटकट करावयासी सबंध नाहीं. त्यानीं यजितखत लेहून दिल्हें आहे तर पंडितमशारनिल्हेचें वतन सुरळीत चालवणें ह्मणोन अमिलास पत्र दिल्हें पाहिजे.