Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १६३ ] श्रीरामचंद्र. २५ मे १७४१.
राजश्री अमृतराऊ पडवळ नामजाद व कारकून, किल्ले, गगनगड, गोसावी यांसीः-
अखडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री भगवंतराऊ रामचद्र अमात्य हुकुमतपन्हा आशीर्वाद व नमस्कार सु।। इसन्ने अर्बैन मया अलफ. येसजी फलाडा बिन शहाजी फलाडा हुजूर उमेदवार होता. यासी किल्लेमजकुरीं नाईकी सांगोन पाठविला आहे. यासी वेतन दरमहा करी दाभोली २५ पंचवीस केलें असे इ ।। सनद पैवस्तापासून वजावाटाऊ करून उरलें वतन शिरस्त्याप्रमाणे देत जाणें यासी जमान " किलो घेणें." जाणिजे छ २० रबिलावल. बहुत काय लिहिणें.
° ˜
श्रीसीताराम - लेखना-
चरण रामचंद्र वधिमुद्रा.
नीलकंठ शरण.
बार.