Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १४२ ] श्रीविठ्ठल. १७३२.
° श्री ˜
सामंतकुलेशोभानु-
र्मागलाख्यमहेश्वर:।
श्रीनागसामंतमुद्रेयं
जनभूत्यै विराजते।।
राजश्री पंतअमात्य गोसावी यांसीः --
सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेहांकित नाग सावंत भोंसले सरदेसाई पा । कुडाळ व महालानिहाय रामराम येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केले पाहिजे. विशेष बहुत दिवशी पत्रें पाठविली, पावलीं. व वेदमूर्ति राजश्री माद पाध्ये व राजश्री धोंडोपंत यांकडे कितीएक मुखता सांगोन पाठविलें तें सविस्तर श्रवण होऊन बहुत संतोषातिशय जाहला तेथ सारांश भावार्थ जे आपले आमचे भेटीचा योग होऊन उभयपक्षी जो मनसबा करणें तो एकमतें करावा असें मानस आहे ह्मणून कितेक विस्तारें लिहिलें व उभयतांसही सागितलें तरी बहु उत्तम. यापरते विशेष काय आहे ? मुख्य गोष्टी जे, आपली व आमची भेटी व्हावी, त्यामुळे लक्षशा मनसबे घडतील आह्मांस कायावाचामनेकरून आपली भेटी व्हावी हेंच बहु अवश्यक आहे याउपरि आह्मी आवाडेचे मुक्कामीहून बुधवारी कूच करून मजल दरमजल येउसी येतो एतद्विशीचें वर्तमान वेदमूर्ति राजश्री उपाध्यायीं लिहिलें आहे व राजश्री धोडोपत आले आहेत ते मुखता सागतां कळो येईल बहुत काय लिहावें. लोभ असो दिल्हा पाहिजे आह्मांला आपणापेक्षा दुसरी जोड नाहीं. आह्माठायीं एवढी आवड आहे. तेव्हां जिवानसी षरीक आहो. बहुत काय लिहिणें.
° ˜
विलसति लेखनावधि.