Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ८४ ] श्री. २ जानेवारी १७२३.
प्रधान शिक्का प्रतिनिधि शिक्का.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५० शोभकृतनाम संवत्सरे पौषबहुल चतुर्थी भृगुवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शंभुछत्रपति स्वामी याणीं रा. रखमाजी साळोखी मुद्राधारी व कारकून कोट कोल्हापूर यासी आज्ञा केली ऐसी जे -- रा. खळो नरहर हे उमेदवार होते स्वामिकार्याचे देखोन यांची असामी सभासदात घालून पाठविले आहेत. यांचे चालवणे, हें स्वामीस परम आवश्यक आहे तरी तुह्मीं यांचे हातें स्वामिकार्य घेत जाणें. यास वेतन सालीना देखील चाकर होन पा। ५०० पाचशे रास केले असत. इ।। पैवस्तगी पासून वजावाटाऊ दंडकप्रो । वजा करन उरलें वेतन शिरस्तेप्रमाणें पावीत जाणें यास जमान-- तुह्मीं कोट मजकूर घेणें, जमान कतबा हुजूर पाठवणें.
लेखनालंकार
मर्यादेयं विराजते
रुजू सुरनिवीस
तेरीख १७,
रबिलाखर, सु।। आर्बा अशरीन
बार सुरु सूद बार.