Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ८५ ] श्री. २ जानेवारी १७२३.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५० शोभकृतनाम सवत्सरे पौष बहुल चतुर्थी भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शंभुछत्रपति स्वामी याणीं राजमान्य राजश्री आपाजी पंडित व रामराव बाळाजी यासी आज्ञा केली ऐसी जे - राजश्री भगवंतराव अमात्य हुकमतपन्हा यासी कीतेक स्वामिकार्याची आज्ञा करून त्या प्रातें रवाना केले आहेत. हे स्वामिकार्याविषयीं तुह्मास लिहितील व सांगोन पाठवितील. तरी तुह्मीं आपल्या जमावानसी यास सामील होऊन यांचे आज्ञेप्रमाणें स्वामीकार्य करीत जाणें. बहुत काय लिहिणें. लेखनालंकार.
मर्यादेयं विराजते.
सुरु सूद बार.