Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ७९ ] अलीफ. ३० जून १७१९.
राजे शाहू याणीं बादशाही कृपेस आपला सत्कार जाणोन समजावें की, सांप्रत थोरले बादशाह याणीं कैलासवास करण्यापूर्वी तीन चार दिवस आह्मीं दौलतीचा अधिकार करावा असे सांगितलें. त्याजवरून छ २० रजब सन ११३१ रोज शनिवार तक्तनिसीन जाहालों आणि खजिना व हुकूम शिक्का वगैरे स्वाधीन जाला. याजकरितां तुह्मास हा फर्मान लिहिला आहे. तरी तुह्मीं एविशीचा संतोष मानून पूर्ववत् लक्षात वागण्यांत आपले कल्याण जाणावें. आणि अलमअलीखान वजीर व त्याजकडील कामगार व ठाणेदार यासी मदत देऊन असा बंदोबस्त राखावी की, बादशाही मुलखात बंडें वगैरे कोणतेही रीतीनें खराब न करीत. छ. २७ रजब, सन १ जुलूस.