Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व २. मंगळवार शके १७१५.
विनंति उपरि. राजश्री रावरंभा यांनीं दफ्तराचें झट बजाजीपंत वगैरेकडे लाविलें होतें. याची पंचाईत मध्यस्तापासी होऊन ठरलें त्याचा त।। पूर्वी लिहिल्यावरून कळला असेल. बजाजीपंत व बक्षी व जामदार ऐसे दफ्तराचे शोधाकरितां हैद्राबादेस गेले होते. तेथून दफ्तरें आणिलीं, बाजीस दाखविलीं. त्यांत तें दफ्तर सांपडलें. बाजींनीं यांस सर्वांस सांगितलें कीं “ आमचें दफ्तर आह्मास सांपडलें.'' या प्र॥ जालें. बजाजीपंत वगैरेवर आळ रिकामा आला होता तो दूर जाला. तुह्मास कळावें सबब लि।। असे. मध्यस्थानी बाजीदेखत आह्मांस सांगितलें कीं “रुमाल-कागद सांपडलें. ऐसें बाजीसाहेबांचें ह्मणणें मुबारक" ह्मणोन. आह्मीं बोललों “नाहक पेंच ब्राम्हणावर आणिला होता. आतां पार पडला. "बाजी आम्हासी बोलले कीं “ घरची गोष्ट मुषीरुल्मुलूकपर्यंत बजाजींनीं कशास नेली ?” याचें उत्तर त्यास आह्मीं केलें कीं हा दोष बजाजीकडे किमपि नाहीं. माझी ताकीद बजाजीस होती कीं मुषीरुल्मुलूक यांजपाशी गोष्ट न काढावी आणि आम्हीही याविसीं बोललों नाहीं. तुम्हीच जामदार आदिकरून प्रथम मुषीरुल्मुलूक यांजपासी घेऊन गेला. नंतर मध्यस्ताचे बोलावण्यावरून बजाजीपंतास पाठविलें, ऐसें असतां आपण बजाजीपंत यांजकडे फायष केली याचा दोष ठोवितात हें मलाच आश्चिर्य जालें.” याजवर बाजींनीं कांहीं उत्तर केलें नाहीं. आणखीच गोष्ट काहडली, सारांश म-हाटे काबाडीचे ! ईश्वर या कारभारांतून तुम्हास कधीं सोडवील याचे नवस कारतों. र॥ छ. १५ जिल्काद हे विनंति.