Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री. चैत्र शुद्ध २ शके १७१६,
ता. १७७४।१७९४

विज्ञापना यैसीजे: नवाबाकडुन ( न ) साहेब याचे षादी समर्थे पत्रे सरकारांत आली, याची उत्तरें पोहचवून स्वारी न येण्याचा भाव समजला ह्मणजे नबाब बौरचीस जाणार, तेथून हैदराबादेस जावें यैसी परभारें बातमी समजली. त्यास बहुतकरून हैदराबादेस जाणार नाहीत असे असतांही । जावयाचा निश्चय पूर्णपणे जाला असे समजलियावरून बाबासी व दौलासी तुह्मीं बोलावें. जे अजमासे बेदरास येणें जालें यांत सरकारचे लढे जुज यातीचे उगऊन परस्परं भेटी होणे चांगलें. यास्तव ही गोष्ट करुन हैदराबादेस जाणे हे सलाह या प्रों वेलणें हें कीं यावर जातील जावोत ह्मणेन आज्ञा त्यास प्रस्तुत येथे फार घौहरत जाली की नबाब रमजानची महिना जालियावर हैदराबादेस जाणार यात ( त ) था नाहीं. जनान्यांतलंही बातनी (मी) या प्रकारचीच तेव्हां मुषरुलमुलुक यांस पुसावयास पाठविलें की हैदराबादेस जाण्याची खबर फार प्रगटात आलेली आहे याचा काय निश्चय जाहला तेव्हां त्यांनी सांगितले की मी ही असेच लोकांचे बोलणे ऐकत. परंतु नबाब मसी अद्याप बोलले नाहीत आणि निश्चयही जाण्याचा दिसत । नाही. या प्रों त्याजकडील निरोप आला. याचा तपशील अलाहिदा लिहिला आहे, त्याजवरून ध्यानात येईल. जाण्याचा निश्चय असे खचित समजलें ह्मणजे स्वामीचे आज्ञे प्रों बोलण्यांत येऊन उत्तर होईल ते लिहीन, छ १६ रमजान हे विज्ञापना.