Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

चैत्र शुद्ध २ शके १७१६,
ता, १७॥४॥१७९४

विज्ञापना ऐसीजे, सरकारचे पत्रा अन्वयें मुषीरुलमुलुक यण बोलणे जालें ते वेळेस त्याचे बोलण्याचे उद्गार निघाले त्याचा तपसील:-

१ सरकारचे पत्रांतील मार यैकोन बोलिले की * आतांच इतके नेटानें कां लिहिलें ? होळकर यास बलावणी गेली. तें आलियावर नेट धरावयाचा होता'. याचे उत्तर दिले की “राब शिंदे असतांनाच होळ)करांस बोलावावें हा निश्चय ठरून पत्रे पूर्वीच गेली आहेत. नवाबाची श्रीमंताची दोस्ती जुज, यांत कुल. यांत वाजवी जाबसाल. यास दुस-या कोणाची दरकार नाहीं, दोस्तीचा जाबसाल यास हाळकराचे प्रतीक्षेचे कारण नाहीं.

१ आणखी येक गोष्ट अशी आहे की ‘श्रीमंताचे नुकसान बंदगान अली यांस करणें नाही. तसेच, बंदगानअलाच नुकसान श्रीमंत करीत नाहीत, हा निश्चय, तेव्हां दौलतीस व उभयतां सरदार यांचे कांहीं होत नाही. मगर, मदारुल माहाला यांचा व माझा उभयता मझला याजमुळे इतका प्रकार त्यास हा निश्चय करून ठरविला आहे की मदारुलमहाला याचा गुरु तुटेल अथवा माझा उरु मोडेल, दोहींतून येक गोष्ट होईल, ईश्वर इच्छा. काय घडेल पहावे. याप्रों स्पष्ट बोलून हसले. मलाही हास्य येऊन बोललो की “आपले बुधीची हातवटा कोणास यावयाची नाहीं. मसलहत करण्याची जात विलक्षण पाहिली. ईश्वर आपल्यास सलामत राखो ? ६ व आय मनांत आलें ? ' ह्मणोन पुस लागले. तेव्हां बोलियों की * अंत:करणाची जात साफ, कांहीं मनांत ठेवावयाचे नाहीं. येक वेळ गोष्ट मनांत मनांत आली ह्मणजे तिचा जाहिराणा करून बोलत असावें. अशी छाती कोणाची आहे? बंदगान अलीचे कारभारी जे पूर्वी जाले. परंतु आपल्या मुकाबल्यास कोण येणार नाही, असे बोलल्यावर सणाले की, 'सिधांताची गोष्ट ध्यानांत आलीयावर काय भय ? आणि संकोच कश्यास ? दोन दोन हात हेही आहेत, असे बोलले. नंतर त्यांस #टलें कीं * आपले सारखे दाम येथ परियंत वाढु देणार नाहींत ही आह्मांस खातर जमा आहे.
----

सदरहू प्रों मार जाला, छ १६ रमजान हे विज्ञापना.