Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
चैत्र शुद्ध ३ शके १७१६, ।
ता. १७।४।१७९४,

श्रीमंत राजश्री--------------------रावसाहेब

स्वामीचे सेवेसीं-

विनंती सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक साष्टांग नमस्कार विनती वि. ज्ञापना ताा छाा १६ माहे रमजान मु॥ बेदर येथे स्वामीचे कृपावलोकने सेवकाचे वर्तमान यथास्थित असो विशेष, स्वामी छ २० माहे पाबानचे आज्ञापत्र पाठविलें तें छ १ माहे रमजान पावलें. " स्वराज्य प्रकण नवा बाकडून फडचे व्हावयाचे या विषई राजश्री रघोत्तमराव व बाबाराव त्याजकडील उत्तरे बोलले. परंतु फडच्याची सुरत दिसत नाहीं, याजकरितां त्यास नवाबाकडे जाण्याविस आज्ञा केली. त्यांनी नवा(बा) चे परवानगीची उजर केला. पर्ने हो त्यांनी लिहिली आहेत. तुह्मीं नवाब मुषीरुलमुलुक यांसीं बोलोन यांस बलाउन घेणे ह्मणन आज्ञा त्यास आज्ञेप्रों दौलासी सर्व मारि बोलण्यांत आला. त्याची उत्तरे यांनी सांगितली ती अलाहिदा पुरवणींत लिहिली आहेत. अवलोकने ध्यानांत येईल सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.