Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
चैत्र शु. ८ सोमवार शके १७१६.

विनंति विज्ञापना. बाहलोलखान इसमाइलखान यांचे पुत्र यांजकडे अलजपुरची सुभेदारीचे काम आहे. सांप्रत छ. ४ रमजानी नबाबांनी अलजपुरची रुखसत खानमार यास दस्तबंद जोडी वे पानदान दिल्हें. अषफजंग त्यांचे कारभारी यांस मोत्यांची कैटी दिल्ही. त्याजवर औरंगाबादचे सुभेदारीचें व पैठण वगैरे तालुक्याचे काम बहलोलखान यांसीं बोलणे होऊन टरलें. फकरुदौला व चिमणीराजे यांची तगीरी होऊन बाहलोलखान यास सनदांपत्रे व खिलत छ ९ रमजान जाला. दौलाचा निरोप घेऊन या उ. परी खानमार कुच करून जाणार. राा छ १३ रमजान हे विज्ञापना.