Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री. चैत्र शुद्ध १४ शके १७१६
ती. १४ एग्रील १७९४ ईसवी.

विनंति विज्ञापना, गफुरजंगाचे चौघे पुत्रांकडे च्यार कामें. येकास खान सामानी. येक बर्ची खान्याचा दारोगा. येक बेदरचा किल्लेदार, येकाकडे बादशाही दिवाणीचे काम. दौलाचे आप्त, च्यारी कामें मेटींच, येक घरीं. सांप्रत अमिनुदौला तारासाहेब ज्याकडे बेदरचा किल्ला. त्यांस नवी वांनी सांगितलें * अंगुराची रखवाली यहतियातीने करावी ' असे सांगितले असतां अंगुराची महतीयात न जाली, लोकांस, कंचन्या वगैरे अंगुर दिल्हे, हे नवा बास समजल्यावरून ज्याच्याने अंगुराची रखवाली झाली नाहीं तो किल्याची बंदोवस्त काय राखील?'' या प्रो बहुत रागें भरून किलेदाराचे काम त्याज. कडील तूर्त मना केले. दुसरे, अषज्याउलमुलुक याजकडे बबखान्याचे काम होते. त्यांनी (न)बाबांकडील माहालांत खाना पाठविणें तो तुपांत च्यर्थ्यांची मिसळ करून पाठविला. बेगमांनी चौकशी करून नवाबास समजाविले. त्यावरून त्यांजकडीलही बबखान्याचे काम दुर करुन ते गजगोपासी ( व ) बर्चीचा दारोगा होता तो हैद्राबादेत आहे; त्यास बलाऊ पाठविलें, येकुन गफुरजंगाचे दोघे पुत्रांकडील दोन कामांची व्यवस्था तूर्त या प्रो जाली, किलेदाराचे काम अद्याप काहाडलें नाहीं. तजवीज होत आहे, बबरची खान्याची दारोगी थोरले भावाची काहाडली, र॥ छ १३ रमजान है विज्ञापना.