Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

१ श्रीमंत बाजीरावसाहेब व चिमाजीअप्पा व नाना फडणीस व रघोजी भोसले व दवलतराव शिंदे व तुकोजी होळकर व मशरीनमुलुख, मानाजी फाकडे व घोरपडे, पाटणकर, निंबाळकर, हुजरांत पागेचे सरदार यांच्या भेटी कार्तिक वद्य १२ स जाल्या.

१ श्रीमंत बाजीराव रघुनाथ यांस पेशवाईची वस्त्रें आणावयास सातारीयास अबा शलूकर गेले होते, त्यांणीं वस्त्रें व शिकेकटार आणिलीं, तीं मसनदीवर ठेऊन मार्गशिर्ष शु॥ ६ सोमवार छ. ४ जमादीलाखरीं तेरा। घटका रात्रीस मुजरे करून घेतलीं. बाजीराव रघुनाथ पंत प्रधान जाले. पुढें फागुन अखेरपर्यंत मजकूर जाले ते
.

१ गोदिंदराव गाईकवाड यांस वस्त्रे जाल्याचें पत्र बाजीरावसाहेब यांणीं छ, २५ जमादिलाखरचे पाठविलें. त्यांत छ. ४ जमादिलाखरीस वस्त्रें जालों असें लिहिलें आहे. त्या पत्राची नक्कल तात्या मजमदार यांजवळ आहे त्याजवरून.

१ बाजीरावसाहेब यांची स्त्री, धोंडोपंत मंडलीक यांची कन्या मृत्यु पावली, तिची क्रिया डे-यांत लष्करांत पौषमाशीं केली.

१ माघ श्रु॥ ५ गुरुवारीं छ. १८ साबाजी बाजीरावसाहेब व चिमणाजी अप्पा व अमृतराव व त्यांचे पुत्र विनायकराव व अमृतराव यांची स्त्री अशीं पहाटेस गजराचे वेळेस पुण्यांत शनवारचे वाड्यांत दाखल जालीं. वाड्याभोंवतीं चौकी शिंदे यांजकडील तोफा व पलटणचे लोक होते.

१ बाजीरावसाहेब यांचे लग्न फाल्गुन माशीं जाले. कन्या दाजीबा फडके यांची; नांव राधाबाई ठेविलें.

१ बाळाजी जनार्दन बुधवारचे चावडीजवळचे वाड्यांत यरंडवणें येथून राहिले. कारभार त्यांचे विद्यमानें चालला. परशरामभाऊ यांणीं कर्जपट्टी लोकांवर घातली. हातीं तिचा वसूल चालविला. शिंद्यास पैसा द्यावयाचा होता तो त्यांस देत गेले.
-----