Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ शिंदे यांचे फौजेंत फितूर जाला. बाजीरावसाहेब यांजवळही लोक जमा जाले, व मानाजी फाकडेही लोक जमा करूं लागले; तेव्हां कोणे वेळेस बाजीरावसाहेब यांस काढून नेतील हा भरंवसा बाळोबा पागनीस यांस पुरेना. याकारितां बाजीराव साहेब यांचे तीन दिवस पाणी बंद करून त्यांचे बाडांत लोक होते ते काढून देऊन बाजीरावसाहेब यांस हिंदुस्थानांत पाठविण्याकारितां रवाना केलें, ते केसो गोविंद यांचे बेलापूर पावेतों गेले.
१ मानाजी फाकडे यांचे भोंवतें पलटण तोफा ठेऊन त्याचे पाणी बंद करून त्यांस काढून दिल्हे, ते वाई देशीं जाऊन फौज जमा करून राहिले. मालोजी घोरपडे व निळकंठराव परभु, अगोदर गेलेच होते. व बज्याबा शिरवळकर यांस माहाडाहून नानानीं वाई प्रांतीं पाठविलें, ते सारे एक होऊन फौज जमा केली, खर्चास देत होते.
१ भोसले यास नानानीं माघारें आणविलें. येणेंप्रमाणें नानानीं माहाडास राहून मसलत केली.
१ नानाचे राजकारण सिद्ध होऊन अश्विन वद्य १२ गुरुवार छ० २५ रबिलाखरी चिमणाजी माधवराव वाड्यांत असतां शिंदे यांणीं बाळोबा पागनीस यांस कैद करून चक्रदेव यांजबरोबर शिंदे, मशरीन मुलुख यांची फौज येऊन, परशरामभाऊ यास जाग्यावर धरावें असा नारोपंत चक्रदेव यांचा बेत होऊन, परशरामभाऊ वैद्य (यास?) नारोपंत चक्रदेब यांणीं चिट्ठी पाठविली ती जासुदानें चुकून परशरामभाऊ पटवर्धन यांस दिल्ही पाहून ते सावध होऊन अप्पासाहेब यांस बरोबर घेऊन विठ्ठलवाडीकडे गेले, तिकडून जुन्नरास गेले; वाटेस घोडनदीचे काठीं--कुळकर्णी यांचे घरीं अप्पासाहेब यास लाहीपीठ घेतलें. त्या कुळकर्ण्यास शंभर रुपयांची जमीन द्यावयाचा करार केला होता परंतु ती पावली नाहीं. नारोपंत चक्रदेव, परशरामभाऊचे मागें जुन्नरास गेले. तेथें परशरामभाऊ अप्पासाहेबसुद्धां किल्यावर जाऊन राहिला. खालीं नारोपंत चक्रदेव फौजसुद्धां गेले. तर दुसरे रोजीं चक्रदेव याणीं बाण किल्ल्यावर लाविले. ते बाण जेथें घोडी फार होती त्यांत पडल्यामुळें बहूत हावालदिल होऊन बोलणें लाऊन अप्पासाहेब यांस चक्रदेव यांचे हवालीं केलें आणि अनंतराव रास्ते यांस जामीन देऊन परशरामभाऊ त्यांचें हवाली जाले. रास्ते यांणीं त्यास भीमातिरीं मांडवगण फुराट्याचे आहे तेथें नेऊन ठेविले, अप्पासाहेब यांस चक्रदेव यांणीं पुण्यालगत भांबवड्यास आणून ठेविलें. छ. १७ जमादिलावेल कार्तिक वद्य ४ शुक्रवार, राघोपंत यांस कैद करून किल्ल्यावर ठेविले.