Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
चिमाजी अप्पा यांस वस्त्रे जाल्यावर नानासः पुण्यास येण्याविशीं बाळोबा पागनीस यांचा रुकार घेऊन परशरामभाऊ यांणीं सांगून पाठविलें. त्यावरून नानांचें बोलणें पडलें कीं भाऊंनीं आपले चिरंजिवास येथें पाठवावें. त्याजवळ बोलणें होऊन ठरेल तसें करावयास येईल ह्मणोन सांगितलें; त्याजवरून परशरामभाऊ यांणीं आपले चिरंजीव हरी परशराम यास नानाकडे रवाना केलें. त्यांणीं सडे जावे. ते पांच हजार फौजेनिशी शिरवळास गेले; त्याजवरून नानाचे मनांत फौजेसुद्धां येतात तेव्हां कांहीं दंगा करावयाची मसलत दिसती असा अंदेशा आला, व बाबा फडके यांणींही सांगून पाठविलें कीं आपण करणें तें सावधगिरीनें करावें, व आणखीही लोकांनीं बातमी सांगितली त्याजवरून वैशाख वद्य ३० छ, २८ जिल्कादी मुहूर्त न पहातां तेथून सडे निघोन प्रतापगडास गेले आणि घाटबंद्या करून माहाडास गेले.
१ नाना निघोन गेले ही बातमी येतांच बाळोबा पागनीस यांणीं परशरामभाऊस सांगितलें कीं नानास धरावयास पलटण देतों. तुह्मीं आपलीं फौज पाठवून नानास धरावें; तेव्हां भाऊंनीं सांगितलें, की तूर्त असें करावयाचें नाहीं. नाना अनकुळ नच होते तरी मग तसें करूं असें सांगितले, परंतु नानाचे भाऊचे दिवसेंनदिवस वाकडेपणा वाढत चालला त्याजवरून परशरामभाऊ यांणीं नानाचे वाडे व सरंजाम जप्त केले.
१ शिंदे यास खर्चास ऐवज द्यावयाकरितां परशरामभाऊ यांणीं कर्जपट्टी शेहरांत केली.
१ शिंदे यांचे लस्करची लाही वगैरे मुलकांत होऊन रयतेस उपद्रव फार होऊ लागला,
१ परशरामभाऊ यांणीं-मोकळें करून खरड्याचे स्वारीस ऐवज नवाब यांचे सरकारांतून घ्यावयाचा ठरला त्यापैकीं येणें राहिला तो ध्यावयाचा ठरविला. मोकळे होऊन गुळ टेंकडीजवळ राहिले. त्याणें आपले जवळ हैद्राबादेहून कांहीं फौज आणविली व कांहीं पुण्यांत नवी ठेविली. त्या फौजेंत हुजरातचे फौजेचे लगतीचीं फौज नारोपंत चक्रदेव यांणी फार पाठविली.
१ नाना माहाडोस गेल्यावर त्यांणी मसलत केली.
१ रायगड वगैरे किल्ले लक्षांत राखोन किल्ल्यांचा बंदोबस्त केला.
१ रायाजी पाटील यांचे हातून दवलतराव शिंदे यांशीं राजकारण करून पागनीस यांस कैद करावें आणि बाजीरावसाहेब यांस मोकळें करावें, शिंदे यांणीं फौजेसुद्धां हिंदुस्थानांत जावें ह्मणजे दाहा लक्षांची जाहागिर वे नगरच. किल्ला द्यावा असें केले; त्यावरून राज्यकारण जमलें.