Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
येणेंप्रमाणें मजकूर जाले.
१ श्रीमंत बाजीराव रघुनाथ प्रधान यांस मार्गशिर्ष शु।। ६ पेशवाईचीं वस्त्रै होऊन पंत प्रधान झाले, ते समई सरकारची दौलत व मनुष्यें कांहीं होतीं बी।।
१ सरकारचे कारखाने,
१ तोफखाना सखारामपंत पानशे व त्यांचे पुतणे गणपतराव विश्वनाथ पानशे वगैरे.
१ खुद्द सखारामपंत. १ गणपतराव विश्वनाथ,
१ माधवराव कृष्ण, १ जयवंतराव
----- ------
२ २
-------------
४
१ याजकडे होता. दारुगोळा तोफाचे गाडेसुद्धां गोलंदाज, खलासी गाडीवान वगैर कामगार मणसें व रखवालीचे
गाडदी, खर्चास माहाल व गांवगाड्याचे बैलसुद्धा कारखाना तयार होता.
१ पिलखाना.
१ सरदार भगवंतपंत दर्शनी.
१ सरदार अलीमाहात
कारभारी रामचंद्रपंत गाडगीळ,
----
२
एकूण दोन कारखाने मिळोन हत्तीपत अजमासें १०० शंभर यांचे चाकरीची माणसें व हत्तीचा सरंमजामसुद्धां तयार.
१ उष्टरखाना नि॥ गणपतराव मोरेश्वर सरंमजामसुद्धां ऊंजफर अजमासें १५०० पंधराशें.
१ फरासखाना नि॥ राघोपंत अंबीकर यांजकडे खडर्याचे स्वारीस डेरे व रावट्या वगैरे सरंजाम तयार केला तो, व दलंबादल डेप्यासुद्धां सरंजाम कायम.
१ शिलेखाना काम सदाशिवपंत वाकणकर यांजकडे.
१ नारो शिवराम खाजगीवाले कारभारी, गणेशपंत मटंगे याजकडे कारखाने.
१ कोठी, २ लकडखाना, ३ इमारत, ४ बागा, ५ पेठा पुण्याच्या, ६ कुरणें, ७ वहींत कोठी, ८ रथखाना, ९ शिकारखाना, १० देवस्थान पर्वती, ११ नळाचा काखाना, १२ दारुखाना.
------
१२
येणेंप्रमाणें कारखाने होते.