Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ५५३ ]

श्री.

गडकरी यांणी राजश्री खलबतखानियांत आणिलें. त्या दिवशी आईसाहेबांनी तिसरे प्रहरपर्यंत उपवास केला. आपाजी बाबूरावहि वरता गेला होता. हेहि मध्यस्थींत होते. निदान राजश्रीच्यानें निराळा फड करावयाचें अवसान न होय. राजश्री जाऊन मातुश्रीचे पायांवर डोई ठेविली. भोजन पंक्तीस केलें. पुराणकास काढावा (हें) सुप्रयुक्त होईल तर बरें नाहीं तर जबरदस्तीनें करावें, असेंहि गडकरी बोलत. परंतु राजश्री नेटून सांगत नाही. जर असें केलें तर ह्मातारीजीस खंतु लागेल ह्मणून भितात; यास काय करावें ? गडकरी यास रोजमरा द्यावयास ह्मणोन पंधरा वीस हजार रुपये अंत्यस्तें राजश्रींनी आपलें खासगत पोतें जगनाथ ह्मणून पानगावकर आहे त्याजकडील पाहाटेचे न कळत घेऊन गडावर गेले आहेत. राजश्रीची प्रकृत स्वामीस विदितच आहे. लागी माणूस जवळ नाहीं, जें भलती एक नेटून करवील. ऐसियास, खालून मातबर पांच सात वरतें घ्यावे; राजश्रीस राजश्रींप्रमाणें नेट द्यावे; आईसाहेबास आईसाहेवाप्रमाणें दमदार करावी; आणि स्वामीचे लक्षाप्रमाणें यांनी मनसबा सिद्धीस न्यावा; पुरणकांनी जीवभय घेतलें आहे. त्याजमुळे आईसाहेबही निकर्ष करणार. त्यांचें भय तूर्त वारावें. हरकसें करून राबत्याखाले घालून खाली आणावी असा विचार केला आहे. आईसाहेबांनी स्वामीसहि आणखी एक पत्र पाठविलें आहे; त्यांत काय मजकूर लिहिला आहे न कळे ! त्याचें उत्तर आलियावर, काय करणें तें करूं ह्मणतात. मग पत्र लिहिलें आहे खरें किंवा उगाच बाहना करून दिवसगतीवर घालतात न कळे ! आईसाहेबांसी लटकेलाडें हरप्रकारें बोलोन हात गुंतला तो मामला करावा. राजश्री एक दिवस उपवास करते, अगर निष्ठूर दाखविते, तर गडकरी यांसहि बोलावयास जागां होता. तें अवसान, एकटा पडला आहे, त्यामुळें न होय, यास्तव दिवसगत लागते. यास्तव, सांप्रत वरते दोघाचौघांस घेऊन नेटून लौकर करावयाचा विचार केला आहे. स्वामीचें पुण्य समर्थ आहे ! श्रीकृपें स्वामीच्या मनोदयानरूपच घडेल. राजश्रीचे मतें मातुश्रीनें समजून सोहलतीनें करावें असें आहे. तें तर होत नाही. याची तर भ्रांत फिटत नाही. उगी माणसासमागमें राजश्रीस सांगून धडावें, तर तो काय जाऊन सांगेल, न कळे ! तर्ही सांगोन पाठवितों. परंतु नेट नाहीं.