Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५४८ ]
श्री.
श्रियासह चिरंजीव राजश्री दादा यासी प्रति बापूजी माहादेव कृतानेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। छ २९ मु॥ इंद्रप्रस्थ जाणून स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें पावलें. वर्तमान विदित जालें. ईश्वरें पुनर्जन्म केला. याचा शुक्र कोठपर्यंत करावा ? औषध उपायास तेथें च्यार दिवस चलवावें. सत्वरसत्वर येथेंच यावें. ते जागा उत्तम नाहीं. ज्यांणी तिसा वर्षाचे वयांत ज्यानचा कैफ टाकिला, तेथें सहसा न रहातां येथेंच येणें. न याल तरी मजला मारून टाकाल याची शफत असे. मातुश्रीसहि बोलाविलें असे. सत्वरीच येतील. लौकर लौकर येऊन श्रीकृपेनें आरोग्यता करणें. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.
वेदमूर्ती रा॥ रा॥ नानाभटजी व रा॥ जनार्दन बाबादेव यासी नमस्कार विनंति उपरि. अभ्रकाचे म्यान्यांत स्वार करून चिरंजीवास रात्रीस कूच करून लौकर येथें येत तें करणें. हे विनंति.
चिरंजीव सौ। रेणुका व सौ। तुळजास आशीर्वाद उपरि. चिरंजीवास घेऊन सत्वर येणें हे आशीर्वाद.