Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ९७ ]
श्री. शके १६५६ आषाढ वद्य १३.
राजश्री माहादेभटजी गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। राणोजी सिंदे दंडवत विनंतिं उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिलें पाहिजे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविले ते पावले. यादीदास्तीप्रमाणें फर्मान जाहालें. व +++ प्रों। करार जाहला. तूर्त एक लाख रुपये दिल्हे. वरकड पुढें दरमहा देणार. ऐसियासि, दोन महिने जाहाले. पुढें दुसरा समाचारच येतां दोन महिने लागतील. खर्चास काय करावें ? त्यास इतबार अझून नयेच ! धातुपोषणच करितात ! तरी या सलुखाचें काय घ्यावें ! अवघा पैका बोलीप्रमाणें घेणें. व येथील बंदोबस्ताचें काम चाली लावावें लागतें. तरी सुभ्याची सनद व कुमकेचीं पत्रें, समेत तोफखाना, सवाइजी व राणाजी व बुंदेले, कोठें, नखर, वोडसे, दतिया, भदावर, वगैरे घेणें. माळवाचा बंदोबस्त करून ++++ नवाबच येऊन कुमक करितील ++++ करूं. पुढे फौजाही जमा होतील. त्याप्रमाणें +++ करून मोठें एखादें पातशाही कामकाज अंगरे अवघे मिळोन पातशाही मुलाजमतेस नेल्यानें कळेल कीं, सर्व गोष्टी अमलांत येतील. पातशाहास संतोष कितीएक गोष्टी आहेत. याबद्दल सुबियाची सनद व कुमकेची तरतूद करून अर्धा खर्च व यादीदास्तीचे कुली फर्मान घेऊन येणें. सिरुपाड इनामत देतात ते अवघ्या सरदारांसही इज्जतलायख घेणें. कार्याचे माणूस आहेत. या +++++ होय तें करणें. जाणिजे. छ. २६ सफर. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तबसूद.
श्री
जोतीस्वरूपचरणीं
तत्पर जनकोजीसुत
राणोजी शीदे नीरंतर.
पो छ. १३ रबिलावल.
छ० ११ सफरीं पाठविलें
होते. भगवान वद्याराम म॥ सोभा.