Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ९६ ]

श्री. शके १६५६ अषाढ वद्य १०.

राजश्री. महादेवभट हिंगणे गोसावी यांसिः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य

स्नो राणोजी शिंदे दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्मांकडील कांहीं वर्तमान कळलें नाहीं. विसा दिवसांनीं ++++ स, त्यासी दोन महिनें जाहाले. अद्याप कार्य ++++ उजेनीस आलियावरि येथील खर्च पाहिला तो ++++. २५००० रुपये पोट मात्र चालावयासी पाहिजे. त्यांणी फारसें दिल्हें तरी रोज ५००० पांच हजार देणार. मग उपाशी मरायांत काय जीव ? याकारणें राजश्री पंतप्रधान आवघे फौजेनसी देशास गेले. आह्मी व राजश्री मल्हारबा, व यशवंतराउ पंवार, तुकोजी पंवार बारा हजार फौजेनसी राहिलों. राहिलियावरी तमाम गिरासी यांचा बंदोबस्त केला. पटारीस ठाणें बसविलें; लालगडवाला लुटिला; चोर देशांतरास गेले; रयतीस कौल दिल्हा. प्रस्तुत छावणी सोनदेवाडियांत केली. आगर परगाणियांत आहों. तुह्मांस सविस्तर कळावें ह्मणवून लिहिलें आहे. तुमच्या कराराप्रमाणें सनदा व खर्च, व सुभियाची सनद, सर्व गोष्टी करून देतील तरी सत्वरी करणें; नाहीं तरी, उठोन येणें. जाब ताबडतोप पाठवणें. हा कालवरी पातशाही चाकरींत आहों. दोनीं कामें चांगली केली. पातशाहीमधें खबर आहे की नाहीं ? न कळे ! असो ! जरी बनत असलें तरी सांगावें. नाहीं तरी त्यासि सांगून प्रयोजन काय आहे ? याचा जाबसाल लवकरी पाठवावा. काम न होय तरी उत्तर पाठवावें. छ. २३ सफर. बहुत काय लिहिणें ! हे विनंति.

पो। छ० १० रबिलावल.

उजनीची जोडी याजकडील फकिरा व शामा.

श्री

जोतीस्वरूप चरणीं तत्पर,
खंडोजीसुत राणोजी सीदे
नीरंतर.