Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ९३ ]

श्री. शके १६५६ चैत्र शु॥ ५.

सदरहू नकल यशवंतराव मैराळ यांचे हातची नकल त्याजवरून केली असें. असल नकल भिवराव रघुनाथ यांणी घेऊन ही नकल गोविंदराव सदाशीव यांस करून दिल्ही असे. वरील शेरा भिवराव रघुनाथ स्वदस्तुर असे.

स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ६१ आनंदनाम संवत्सरे चैत्र शुक्ल ५ गुरुवासरे क्षत्रियकुलावंतस श्रीराजाशाहुछत्रपति स्वामी यांणी राजकार्यलेखनधुरंधरविश्वासनिधि राजमान्य राजश्री जिवाजी खंडेराव चिटनिवीस यांसि आज्ञा केली ऐसीजे :-

तुह्मी विनंति केली की, आपले वडील, आजे व तीर्थरूप यांणीं स्वामिसेवा केली. त्याजवरून कृपाळू होऊन चिटनिसीचा दरक वतनी वौंशपरंपरेनीं करून दिल्हा. कारखाननिसी व जमेनिसी दोन धंदे सर्व राज्यांतील परंपरेनें देऊन, शपथयुक्त पत्रें करून दिल्हीं. त्याअन्वयें स्वामींनीही अभयपत्र दिल्हें. चिटनिसी वतनास गांवजमिनी, मोकासे, लावून दिल्हे ते इनाम चालवावेसें अभय वचन दिल्हें. त्याप्रों। पत्र करून देऊन, चालविलें पाहिजे, ह्मणोन. त्याजवरून पूर्वीपासून कागदपत्र मनास आणितां, तुमचे आजे बाळाजी आवजी, थोरले कैलासवासी स्वामींनीं राज्यसाधन केलें तेसमईं, बहुतच श्रम साहास करून, उपयोगी पडले. दिल्हीचे जाण्याचे प्रसंगी संकट पडलें असतां बरोबर सेवा केली व राज्याभिषकाचे समयीं उपयोगी पडोन, स्वामीचे मनोरथसिद्धि केली. त्याजवरून संतोषी होऊन अष्टप्रधानांतील पद द्यावयाची योजना केली असतां, चिटणीसीचे वतनी परंपरेने द्यावी, विनंति केली. यावरून प्रसन्न होऊन शफतयुक्त करून दिल्हें. नंतर थोरले महाराज कैलासवासी जहालेयावर कैलासवासी तीर्थरूप स्वामी यांणी कोणी गैरवाका समजाविल्यावरून राज्यभर सरकारकुन यासि शिक्षा केल्या. त्यांत यांसहि केली असतां, तुमचे वडील खंडो बल्लाळ यांणी बहुत निष्ठेनीं वागून स्वामीचें कोण्हाचे लढाईत शूरत्व करून समुद्राचे भरतीस स्वामीचा घोडा पाण्यांत पोहणीस लागला असतां, धरून, उडी टाकोन घेऊन निघाले. याजवर बहुत संतोष होऊन शफत करून वचन दिल्हें. सर्फराज केलें. तोही प्रसंग यवनांचे प्राबल्य होऊन विज्वर जाहाला. स्वामींसही यवनांचे सन्निध जाणें आलें. तेथें गेले असतां कैलासवासी आबासाहेबाचे हिकडे जाऊन राज्यरक्षणकारण करणें करावयाचे प्रेत्नास लागले. तेव्हां सर्व जातेसमयीं त्यासही संकटसमय प्राप्त जाहाला असतां, त्यास काढून देऊन, आपण क्लेश भोगिले. त्यानंतरचे दिवस जाऊन तेथें सेवा निष्ठेनें केली. तेथें संकटाचा प्रसंग प्राप्त होऊन निघणें दुर्घट पडलें असतां जुलपुकारखान व गणोजी शिर्के यास संधि करून दाभोळचें वतन दिल्हें होतें. शिर्के यास देऊन त्या मोरच्यांतून पाळण्यांत बसवून, काढून घेऊन, येऊन, देशीं सेवा केली. यानंतर आबासाहेब समाप्त जाले. तेव्हां यवनास दिल्हीचें व्यसन प्राप्त जालें. तेव्हां स्वामीस त्यांनी निरोप देऊन लावून दिल्हें. देशीं येणें घडलें असतां आबासाहेब याची स्त्री आईसाहेब यास आपला पुत्र घेऊन राज्यभार करण्याची इच्छा होऊन दुर्बुद्धि धरली. फौजा देऊन सेनापति व परशराम त्र्यंबक प्रतिनिधि रवाना केले. त्याबरोबर खंडवांस दिल्हे असतां स्वामींस गुप्तपणें भेटोन सेनापतीस सरदार यांच्या खातरजमा करून, सर्वांस स्वामींचे लक्षीं आणिलें. लढाई जाहाली. प्रतिनिधी दमोन गेले. स्वामी विजयी होऊन राज्यभारसाधनप्रसंगांत सर्व स्थलें व सरदार व प्रतिनिधि व सरकारकून यांस स्वामीलक्षीं लागण्याचे उद्योग बहुत केले. पुढेंही तुह्मी त्याअन्वयें स्वामीचे ठाई एकनिष्ठता धरून आंगरे वगैरे मातुश्रीलक्ष्यांतील सरदार जाहाले वगैरे स्वामिलक्षीं लागावयाचे उद्योग करीत आहां. त्याजवरून तुह्मांवर कृपा करणें अवश्यक जाणोन, चिटणीसी तुह्मांस पूर्वी शंफतयुक्त दिल्ही आहे, ती खातरजमेनिशी वतनी दोन धंदे राज्यांतील. त्याप्रों। करार करून देऊन चिटणिशीवतनास गांव व मोकासे व जमिनी लागल्या आहेत. हे इनाम करार करून दिल्हे.

बीतपसील.

१ मौजे बोरगांव प्रो। शिराळें देखील सरदेशमुखी दुतर्फा दरोबस्त वगैरे.
१ मौजे मांजगांव कसबे तलबीड दरोबस्त.
१ मौजे जैतापूर ता। सातारा दरोबस्त देखील पाटीलकुलकर्णीवतन.
१ मौजे नाकेली प्रो युपें दरोबस्त.
१ मौजे निमणी का। कवठें प्रो। मिरज दरोबस्त
१ मजरेभाव माल मौजे साळव तो हिरड़समावळ
१ मौजे ईजर ता। कानपखोरे दरोबस्त
२ तो। रत्नागिरी प्रो। राजापूर.
                  १ मौजे वणगुले तर्फ कर्ज दरोबस्त वतनीखेतीसुद्धां.
                 १ मौजे कलंबस्ते तर्फ संगमेश्वर मोकासी.
                --------
                 २

१ मौजे धामणेर सा। कोरेगांव प्रो। वाई मोकासी. वरमणाखेरीज जमीन वगैरे.
१ मौजे खोजेवाड़ी तर्फ सातारा मोकासा व कुर्ण.
१ मौजे मुरूड तो। तारळें मोकासा.
१ मौजे आमदाबाज तर्फ सातारा मोकासा सारी–बाग जमीन सुद्धां.
२ प्रो। सासवड देहे मोकाशी
                      १ मौजे कोलोली.
                      १ मौजे कारखजे.
                     -----
                      २

१ मौजे वडगांव तालुके करडेरांजणगांव मोकासा वगैरे कुर्णे. सुद्धां.
१ कसबे वडनेर प्रा। चांदवड मोकासा बाबती वगैरे.
१ कसबे खेडेगांव प्रो। वण.
१ मौजे खिदरी प्रो। नासीक.
१ कसबे तिसगांव मोरगांव प्रो। सेगांव मोकासा जकात.
१ मौजे कोंदर तर्फ बीडवाडी मोकासा.
३ प्रो। जुन्नर पो। गांव.
             १ मौजे कवठें.
             १ मौजे वरूड.
             १ मौजे निंबगांव.
           ----
             ३

१ मौजे चिखली प्रा। पाटोदें मोकासी बाबती.
१ मौजे सातगांव तर्फ चांभारगोंदें मोकासा बाबती निमेचे भाई.
१ मौजे काजंडी तर्फ मांडवगण मोकासा बाबती निमेचे भाई.

१. मौजे कनकडु प्रो। उजमन मोकासी बाबती.
१ प्रो। धोंड मोकासी व जकात.
३ मौजे पोटीदे प्रो। दडतुर मोकासा बाबती वगैरे, का। -प्रों।-व मौजे मगरून प्रों। धार.
१ मौजे मुंगळे प्रों। शिरपूर मोकासी बाबती जकात.
१ मौजे धैरगांव प्रो। बीड मोकासी.
१ मौजे हिरडेगांव प्रो। बीड मोकाशी.
१ मौजे वणस गांव प्रो। चांदवड.
६  इनाम वतनी.

           १ मौजे निगडी तर्फ सातारा चावर २.
           १ मौजे सोनगांव तर्फ सातारा चोबर -।-
           १ कसबे निंब प्रो। वाई पो। जमीन बिघे.
           १ मौजे ----- तर्फ उमरज प्रो। कराड पो। जमीन.
         * १ मौजे चिंचनेर तर्फ वंदन प्रो। वाई पो। जमीन बिघे ५.
         * १ मौजे त्रिशीर तर्फ उमरज चावर निमे -॥-
       -------
          ६
       --------
         ४५

यणेंप्रमाणे महाल व गांव व जमिनी तुह्मांस इनाम करून दिल्हे असे. तरी तुह्मी व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें सदरहूचा अनभव करून सेवा करून सुखरूप राहणें. जाणिजे. येणेप्रमाणें सेवा केली आहे. वतनी धंदे. इनाम खाणें. बहुत काय लिहिणें ?

मोर्तब आहे.