Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[३] श्री. १६ जून १७९५.
विज्ञापना ऐसीजे. नवाबाकडे जाणें झालें. स्वामीकडून पुण्यास पावलियाची आणि तहनाम्याप्रकर्णी पत्रें नवाबास आलीं तीं दिलीं. आपले सरकारचा अस्सल तहनामा आपलेजवळ ठेवून त्याची नक्कल दाखविली. पत्रांत तुमचे जबानी हवाला आहे असें नवाब बोलिले. तेव्हां ह्मटलें कीं, आपण मोहर करून तहनामा दिला. त्याचे हिंदवींत आणि पारसींत अंतर आहे, याजकरितां हल्लीं श्रीमंताचा तहनामा आहे याप्रमाणें तोही लिहावा ह्मणजे साफ झालें. मीरअल्लग आणि राजे रेणूराव जवळ होते. तेव्हां नवाब ह्मणाले कीं, तुह्मीं जसें लिहून मागाल. तसें द्यावें कीं काय? मीं ह्मटलें, नवें काय लिहावयाचें आहे ? जें पहिल्यानें ठरलें तेंच आहे. घर घेण्याची गोष्ट ह्मणूं लागले तर काय करावें ? जसें मदारुल महाम ह्मणतील तसेंच करावें. मीं ह्मटलें, गशरुल्ल महाल कराराशिवाय नाहींत, जो करार ठरला तोच बोलतात, अधिक किमीप बोलणार नाहींत, आणि बोलतही नाहींत. तेव्हां ह्मणाले कीं, तुह्मीं आह्मांस रात्र ह्मणा ह्मटलें, रात्र ह्मटली; दिवस ह्मणा ह्मटलें, दिवस ह्मटला; परंतु गोष्टी निभल्या तर पाहिजेत ; कशा निभतील? तेव्हां मी ह्मटलें की हैदराबादेस आतां नुकतेंच येणें झालें, इतक्यांत करारावेगळ चाल दिसूं लागली हें काय? तेवेळेस मीरअल्लम बोलले कीं, तुह्मापाशीं ह्मणून बोलतात. तेव्हां त्यास ह्मटलें कीं, मजपाशीं ह्मणुन असें बोलतात असे असल्यास गोष्ट अलाहिदा, परंतु मला तसें बोलणें दिसत नाहीं, श्रीमंत व मदारुलमहाम यांस लिहून पाठवावें असें बोलणें दिसतें, याजकरितां पुसावयाचें कारण. तेवेळेस नवाबांनीं उत्तर केलें की, इतल्ला देण्याकरितांच बोलतों. तेव्हां क्षणभर उगाच राहिलों. मीरअलम तेथून उठोन नवाबाचे कानास लागले. नंतर बोलले कीं, हजरत बरखास्त झालियावर तुह्मी आह्मीं बसून तहनाम्याचा मवाज्या करूं. त्यानंतर घरगती मामलती प्रकर्ण रेणूराव नवाबाशीं बोलत होते. दोन तीन घटिका बसून नवाब महालांत गेले. उपरांत मीरअलम व रेणूराव व मी असे माडीचे खालीं उतरून चबुत्र्यावर फर्ष केला होता तेथें बसलों. तीन घटिकापर्यंत बोलणें झालें. त्याचा तपशील अलाहिदा. लिहिला आहे त्याजवरून ध्यानास येईल. र॥ छ २८ जिलकाद. हे विज्ञापना.