Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
घावदाव पाहून लढाई होत होती. त्यास, नबाब सिंदखेडास जाऊन खासा अंबारी सिंदखेडच्या दरवाजाजवळ नेऊन, जाधवराव यास ठाण्यातून आणून, खास अंबारीत घेऊन, त्याची फौज व बुणगे बाहेर काढून माघारे फिरले. ते दिवशी सरकारच्या सरदारांनी लढाईचें तोंड लावून प्रहर दीडप्रहर मातबर युध्द झालें. ते समयीं त्याजपासून पंचवीस लक्षांचा मुलूख घेतला. विश्वासरावसाहेब गंगातीरास आले. नवाबही आले. तेव्हां नानासाहेब भाऊसाहेब नगरच्या मुक्कामाहून गंगातीरास गेले. भेटी नवाबाच्याही जाल्या. त्यास, विश्वासरावसाहेबांच्या कुमकेस यावयाविशी जानोजी भोसले सेनासाहेबसुभा यांस पत्रें गेली असतां न आले. यास्तव त्यांस जरब द्यावयाकरितां घाटमाथा गेले. तेव्हां त्यांणीं येऊन बाजिदी केली. मग माघारे फिरोन पुण्यास आले. दसरा झाल्यावर कर्नाटकच्या स्वारीस चालिले. कृष्णातीरास गेले. त्यावर्षी सिंहस्थ होता, याजकरितां कृष्णातीराहून महादाजी अंबाजी याजबराबर फौज व तोफखाना देऊन कर्नाटकास रवाना केले आणि श्रीमंत त्रिंबकास गेले. महादाजी अंबाजी कर्नाटकास जाऊन संस्थानिकांस शह पोहोचवून खंडण्यांचा ऐवज घेऊन पुण्यास आले. मानिल्हेबरोबर मुजफरखान होते. ते रुसवा करून कर्नाटकांत राहिले. त्यांनी सावनूरकर पठाण व मुरारराव घोरपडे सामील करून घेऊन बिघाड केला. तेव्हां श्रीमंत दसरा करून दरमजल कृष्णातीरास गेले. तेथें दादासाहेबांचे दुसरे लग्न करून दरमजल बागलकोटास जाऊन किल्ला घेऊन सावनुरास जाऊन वेढा घातला. श्रीमंत नानासाहेब व भाऊसाहेब व दादासाहेब व विश्वासरावसाहेब व माधवरावसाहेब व सरदार मल्हारजी होळकर व नारोशंकर व विठ्ठल शिवदेव वगैरे होते. व जानोजी भोसले सेनासाहेबसुभा आणिले. व नवाबाकडे त्याचें राजकारण लागलें होते. परंतु सरकारचे वकील परशराम महादेव होते, त्यांणी नवाबास श्रीमंतांचे कुमकेस आणिले. ते आल्यावर त्यांचेही मोर्चे बसवून त्यांचा तोफखाना प्रहर दीडप्रहर सुटोन दीड दोन हजार गोळे सावनुरात पडिले. तेव्हां सारे घाबरे होऊन सलूखाचा मजकूर मल्हारजी होळकर यांचे हातून करविला. सावनूरकरांचा निम्मे मुलूख सरकारांत घेऊन मुरारराव घोरपडे भेटीस आले. तेथून पुढें संस्थानिकांपासून खंडण्या घेऊन आषाढमासी पुण्यास आले. त्याजवर दो-ती वर्षी भाऊसाहेबांस नबाब निजामअल्लीखान याजवर रवाना केले. ते समयीं भाऊसाहेबीं नगर किल्ल्याचे राजकारण करून कवीजंग याजपासून किल्ला घेऊन पुढें दरमजल चालिले. निजामअल्लीखानही भागानगराहून दरमजल पुढे आले. उदगिरीवर समीपता होऊन लढाई सुरू झाली. श्रीमंत विश्वासराव साहेबही समागमें होते. दोन महिने सडे स्वारीनें रात्रंदिवस घोडयावर जिन ठेवून सभोवत्या फौजा ठेवून दावघाव पाहात होते. जिकडे नवाबाचा चालावयाचा रोख तिकडील गांवखेडी सरकारच्या फौजांनी जाळून लुटून फस्त करीत होते. त्यास उदगिरीहून त्यांणी कूच करून पुढे तोफांच्या मारगिरीने रेटीत चालिले. त्यास, अवसा किल्ला नवाबाचा तेथे जाऊन नवाब पोचले. ते समयीं भाऊसाहेब व विश्वासरावसाहेब यांही मोंगलावर दोन प्रहरच्या समयांत हल्ला केला. तेव्हां त्यांणी तोफा व बाण व जेजाला व बंदुकाचा मार अतिशय केला. तितकाही पिऊन पुढें जाऊन हातेर लावावें तो चारणाच्या बैलांची दाटी झाली त्यामुळे हातेर न लागलें. मोंगलांचा चंडोल ह्मणजे दुमदारीचा सरदार धरून आणिला. मोगल जेर झाला. चौफेर फौजा ठेवून तीन चार दिवस बतंग केला. ते समयीं साठ लक्षांचा मुलूख सरकारांत व दीड लक्षाचा दरबारखर्चाचा, एकूण साडेएकसष्ट लक्षांचा मुलूख व दौलताबाद व आशेर व सालेर व मुल्हेर व विजापूर व बराणपूर एकूण सा किल्ले सन सितैनांत सरकारांत घेतले. तेथून पुण्यास यावें. त्यास अबदाली दिल्लीवर चढाई करून आला. याजकरितां पातशाहाचा फरमान नानासाहेबांस फौजेविशीं आला. त्याजवरून भाऊसाहेब व विश्वासरावसाहेब यांची रवानगी फौजसुध्दां केली. दिल्लीस जाऊन पुढें अबदालीची गाठ कुरुक्षेत्री सोनपतपानपताजवळ पडोन लढाई होता अबदालीस मोडले. त्या समयांत विश्वासरावसाहेबांस अंबारीत गोळी लागोन कामास आले.