Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३०] श्री २ एप्रिल १७३१
महाराज परमहंस श्री स्वामीचे सेवेशी.
चरणरज बाजीराऊ बल्लाळ प्रधान कृतानेक विज्ञापना. येथील क्षेम श्रीकृपें त॥ छ ५ सवाल नजीक डभाई यथास्थित असे. येथील वर्तमान तरी :- त्रिंबकराऊ दाभाडे व उदाजी आनंदराऊ पवार व कंठाजी रघूजी कदम व पिलाजी गाइकवाड व चिमणाजीपंतदादा ऐसे तीस पसतीस हजार फौजेनशी आह्माशीं युध्दास आले. छ ४ सवालीं युध्द जाहलें. त्रिंबकराऊ दाभाडे, व जावजी दाभाडे व मलोजी पवार, व पिलाजी गाइकवाडाचा पुत्र असें चौघे ठार जाहले. उदाजी पवार व चिमणाजीपंत पाडाव जाहले. आनंदराऊ पवार व पिलाजी गाइकवाड व कुवर बहादूर जखमी होऊन पळून गेले, व बांडे पळाले. फौज लुटली. हत्ती पाडाव केले. सारांश स्वामीचे आशीर्वादें फत्ते जाहली. आपणांस कळावें, यास्तव लिहिलें आहे. निरंतर स्वामीचें चिंतन करीत असों. सदैव पत्रीं समाचार घेतला पाहिजे. आपणाकडील नारायणजी ढमढेरे ठार पडले; व आणखीही कितेक लोक पडले, व जखमी जाहले. परंतु कार्य जाहलें. कळलें पाहिजे. सेवेशी श्रुत होय. हे विज्ञापना.