Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[२८]                                                                               श्री                                                                       १७३९                                                         
                                                                                                     
श्रीमत्परमहंसबाबास्वामी यांहीं

सौ. संपन्न मातुश्री वीरूबाई यांसी आज्ञा केली ऐसीजे :- परशरामीं होतो तेथें त्रिकाळ श्रीचेंदर्शन होत होतें. पुढे समाधहि तेथेंच व्हावी ऐसें होतें. तेतून रुणानुबंध तुटला. तेथून वरते आलों. राज्यांस व तुह्मास दर्शन दिल्हें. तुमचे निष्ठा आमचे ठायीं बैसली. तुह्मी उदकदत्त, धारादत्त सनदा करून वीरमाडे दिल्हें. थोरलें भादल उसाचें खळें देखील दिलें. तेथें आह्मी नवी बांध बांधोन वोढा मोडून बाग केली. रयतेचे चालवीत असतां संभाजी पाटील यानें आमचें कुरण चारिलें. व येसाजी भागेलीचें पांच वर्षे शेत कापून खातात. ये बाब आह्मास कळली. आह्माजवळ आ बें जा बें बोलों लागले. ह्मणून आह्मी तुमचे भेटीस आलों. सर्व निवेदन केलें. त्याचे अन्याय देखोन हरदूजणास दोनशे रुपया मामला करून मुद्रेनिशी कागद दिल्हे. आमचें समाधान करून निरोप दिल्हा. आह्मी ह्मटलें तुमचें रहिमतपूर व वाडा पाहों. ह्मणून तुमचे वाडयांत रहावयास आलों. त्यास एसाजी सानवणी वाडियांत होता, ह्मणून तुमचे शिपाई आह्मास वाडियांत न घेत. आ बें जा बें बोलिलें. आह्मी त्यांस चार शिव्या देऊन बराबरील माणसें गावांत ब्राह्मणाचें घरी राहिले, व आह्मी जाऊन रानांत दादरावर राहिलों. तेथून सकाळी उठोन धावडशीस गेलों. तेथून माणसे वीरमाडे यास त्याजकडे मसाला घ्यावयास पाठविले तों ते रात्रीसच गुरें माणसें घेऊन पळाले. तुमचे हात लांब. पूर्व समुद्रापासून पश्चम समुद्रापावेतों व आभाळाखालें सत्ता. ऐसें असोन त्याजपासून मसाला घेऊन त्यास गावीं या आणिलें नव्हते. आणि आह्मांस उफराठा कागद लिहिलाजे ते गुन्हेगार असोन तुमचे मुद्रेनिशी कागद असोन आह्मास लि॥ जे संभाजीचे वस्त, भाव, शेत, ऊस, मळा, घर कांहीं तसनस झालें ह्मणजे तुह्मास जाब करावा लागेल. असे कसे रयत करितो. लिहिले यावरून तुमचे ममता आमचे जागाहून उठली ऐसे आह्मास पुरतें कळलें. तरी आतां आह्मास इतका जाब पाठवावा जे वीरमाडे, धावडशी, अनेवाडी मोडून देणें. तुमचें पत्र आलें ह्मणजे गाव सर्व मोडून तुमची सत्ता नसेल तेथें जाऊ. तुह्मी आपले गाव घेऊन राज्य राम करा. ऐसा सानवणी मोठा हरामजादा गडावर घातला होतात तो राजास आह्मी पदर पसरून गडावरून सोडून आणिला. छत्रपतीचा आह्मावर दुसरा एवढा उपकार नाही. व याचें भुताचे यत्न केला असेल तो ईश्वर जाणें. तेथून आह्मीं माळशिरसास गेलों. तेथें तुमचे पत्र संभाजी पाटील याणें घेऊन आलाजे यास माणसांत घालणें. त्यावरून आह्मीं वीरमाडे यास येऊन संभाजीचें घरी दोणाभर ताक घेऊन दाहा जातीस जेवण घालून शोभिवंत केला. त्याणें आमचा उपकार फेडिला.