Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

 [२४८]                                                                       श्री.                                                                  २२ डिसेंबर १७३०.   

श्रीमत् तीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-

अपत्ये सेखोजी आंगरे सरखेल कृतानेक शिरसाष्टांग दंडवत प्र॥ विनंति उपरि येथील कुशल मार्गशीर्ष बहुल नवमी मंदवासरपर्यंत वडिलांचे आशीर्वादें यथास्थित असे. विशेष. स्वामीनीं आशीर्वादपत्र पाठविले तें उत्तम समयीं प्रविष्ट होऊन संतोषवाप्ती जाहाली. याच न्यायें सदैव आशीर्वादपत्र प्रेषण करून अपत्यांचा सांभाळ करीत असिलें पाहिजे. यानंतर, देवास वस्त्रें पाठविलीं तीं चेऊलीं कां पाठविली ? पाऊसांत कैशी टिकतील ? व पैदास्तीपैकीं जिन्नस आणखी पाठवणें, व अंगास लावावयास नारायण तेल पांच शेर व सातारियाकडील वर्तमान लेहून आज्ञा केली. ऐशास स्वामीकडेस वस्त्रें देवास पाठविलीं तेसमयीं संग्रही नव्हतीं. जीं समयीं अनुकूल जालीं ती पाठविली. हालीं पैदास्त तराडियावरीं जाहालीं त्यापैकीं श्रीस पाटाव पुरुषाचे ६ व फडक्या ६ एकूण दागिने बारा पाठविले असेत. व खारका ०।० व खजूर ०।० व गूळ 248 1 व ऊद 248 2 व अगर 248 3 पांच शेर याजप्रमाणें जिन्नस पाठविला असे. चंदन शिलकेस नाहीं. आणविला असे. आलियावरी पाठवून देतों. नारायणतेल वजन शेर 248 4 एक शिसा स्वामीकारणें पाठविलें असे. सदरहूप्रमाणें प्रविष्ट जाल्याचें वृत्त पत्रीं लेहून पाठविलें पाहिजे. वरकड स्वामीचें आशीर्वादें याजपेक्षां पैदास्ती होईल. बहुत काय लिहूं ? कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे. हे विनंति. नारायणतेल सिध्द होतें तें पाठविलें असे. मागाहून आणखी पाठवून देतों. कळलें पाहिजे. हे विनंति.