Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[६७] श्री. ९ मार्च १७५१
श्रीमंत महाराज मातुश्री आईसाहेब याणीं अजम शेखमिराजी यासी आज्ञा केली ऐसीजे :- तुह्मी एकनिष्ठ आहां. तरी तमाम हुजरातचे सरदार एक टोळी करून राजश्री दमाजी गायकवाड यास सामील होऊन कामकाज केलियानें मनोदयानुरूप साहेब ऊर्जित करितील जाणिजे. छ २१ र॥ खर. ज्यादा काय लिहिणें.
मोर्तबसूद
[६८] श्रीभवानी प्र॥ ९ मार्च १७५१
श्रियासह चिरंजीव राजश्री गमाजी बावा या प्रती.
यमाजी शिवदेऊ आशीर्वाद. उपरी येथील कुशल त॥ छ ७ जमादिलावल जाणोन स्वकीय कुशल लिहीत गेले पाहिजे. विशेष शेखखान महमद सेखजीचे होवे यांशीं श्रीमंतांनीं पूर्ववतप्रमाणें त्यांचा सरंजाम त्यांस करार करून दिल्हा असे. ऐशियासी तुह्माकडून गांवखेडेयास उपद्रव होतो ह्मणोन त्यांणीं सांगितलें. तरी शेखजीचा आमचा स्नेह. त्याचे लेक याचे याठाईं दुसरा विचार नाहीं. तरी गांवखेडेयासी उपद्रव न लागे तें करावें. हल्लीं जलखान त्यांचे तर्फेनें आले आहेत, हे सांगतील. त्याप्र॥ सर्व साहित्य करणें. लोभ असो दीजे.
आशीर्वाद.